वोडाफोन आयडियाने (Vodafone-Idea) अधिकाधिक युजर्सला आपल्या सोबत जोडण्यासाठी दोन प्री-पेड प्लॅन लॉन्च केले आहेत. त्याचसोबत Disney Plus Hotstar चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाणार आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत क्रमश: 701 रुपये आणि 901 रुपये आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा सुद्धा मिळणार आहे. ऐवढेच नव्हे तर विकेंड डेटा रोलओवर आणि Binge All Night ची सुविधा सुद्धा दिली जाणार आहे. या सेवेअंतर्गत रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही अतिरिक्त चार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
वोडाफोनच्या 701 रुपयांच्या प्लॅनमध्ये प्रतिदिन 3GB डेटा आणि 100SMS ऑफर केले जाणार आहेत. त्याचसोबत प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शनसह विकेंड डेटा रोलओवर, वीआय मुव्ही आणि लाइव्ह टीव्हीचे एक्सेस दिले जाणार आहे. या डेटा पॅकची वैधता 56 दिवसांची आहे.(Apple iPhone 13: भारतामध्ये Amazon, Flipkart वर iPhone 13,iPhone 13 Mini उपलब्ध; Pro,Pro Max व्हेरिएंट्स Sold Out!)
त्याचसोबत 901 रुपयांच्या डेटा पॅकमध्ये दररोज 3gb डेटा आणि 100SMS दिला जाणार आहेत. त्याचसोबत Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन, विकेंड डेटा रोलओवर, वीआय मूव्ही आणि लाइव्ह टीव्हीचे एक्सेस मिळणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. या पॅकची सुविधा 84 दिवसांची आहे.
वोडाफोन आयडियाचे आधीपासून 501,601 आणि 2595 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. ज्यामध्ये Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन दिले जाणार आहेत. 501 रुपयांच्या प्लॅन बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 3जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, वीआय मुव्ही, लाइव्ह टीव्ही आणि 28 दिवसांची वॅलिडिटी दिली जाणार आहे.