गूगलने (Google) आता National Payments Corporation of India सोबत पार्टनरशिप करत RuPay Credit Card-based UPI Payments चा पर्याय खुला केला आहे. त्यामुळे गूगल पे (Google Pay) वर आता क्रेडिट कार्ड (Credit Card) देखील वापरता येणार आहे. ऑनलाईन, ऑफलाईन व्यावहारासाठी आता गूगल पे वर क्रेडिट कार्डचा देखील पर्याय असणार आहे.
सध्या गूगल पे अॅक्सिस बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक, एचडीएससी बॅंक, इंडियन बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया यांची रूपे क्रेडिट कार्ड्स घेतली जातात. लवकरच अन्य कंपन्यांच्या कार्ड्स चा देखील पर्याय उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
गूगल पे हे यूपीआय बेस्ड पेमेंट अॅप आहे. अनेक पेमेंट अॅप्स हे केवळ डेबिट कार्ड्सचा स्वीकार करतात. पण आता गूगल पे कडून क्रेडिट कार्ड्स देखील जोडून सहज, सुलभ व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. अद्याप गूगल पे वर Visa आणि Master इश्युड क्रेडिट कार्ड जोडण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही. नक्की वाचा: Paytm, Google Pay, Phonepe यांसारख्या UPI पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, सरकारने म्हटले- यामुळे अर्थव्यवस्थेला होत आहे फायदा .
Google Pay वर RuPay credit card कसं जोडाल?
- गूगल पे वर रूपे क्रेडिट कार्ड देखील एखादं बॅंक अकाऊंट डेबिट कार्ड प्रमाणे जोडण्या इतकं सोप्प आहे.
- गूगल पे ओपन करा. सेटिंगमध्ये जाऊन setup payment method वर क्लिक करून Add RuPay credit card चा पर्याय निवडा.
- यामध्ये सहा अंकी क्रेडिट कार्ड नंबर टाका, एक्सपायरी डेट टाका. ओटीपी द्वारा pin Authenticate करा.
- आता तुमचं क्रेडिट कार्ड गूगल पे वर व्यवहारासाठी वापरलं जाऊ शकतं.
बारकोड स्कॅन करून किंवा यूपीआय आयडी वापरून किंवा युजरचा मोबाईल नंबर वापरून देखिल तुम्ही इतर व्यवहारांप्रमाणे क्रेडिट कार्ड वापरून हा व्यवहार देखील करू शकता.