Representational Image |(Photo credits: PTI)

कारचालकाचा विनाकारण अपमान करणाऱ्या ग्राहकांना ब्लॉक करण्याचा निर्णय उबरनं (Uber) घेतला आहे. ब्लॉक केलेल्या ग्राहकांना उबरची सेवा पुन्हा घेता येणार नाही. आपल्या कारचालकांसाठी उबरने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी उबर टॅक्सी सेवेचा अनेकजण लाभ घेतात. प्रवासादरम्यान कारचालकासोबतचा अनुभव लक्षात घेऊन आपण कारचालकाला रेटिंग देतो. या रेटिंगनुसार, कारचालकासोबतचा करार पुढे न्यायचा की नाही, याचा निर्णय कंपनी घेते. त्याचप्रमाणे कारचालकही सेवा घेणाऱ्या ग्राहकाला रेटिंग देत असतात. मात्र कारचालकांनी दिलेल्या रेटिंगकडे कंपनी फार गांभीर्याने पाहत नव्हती. आता मात्र कंपनी याकडे नीट लक्ष देणार आहे. कारचालकाचा विनाकारक आणि वारंवार अपमान करणाऱ्या ग्राहकांना सेवा देणे कंपनी बंद करणार आहे.(खुशखबर! आता उबरची हवाई कार; ट्रॅफिकच्या त्रासापासून नागरिकांची लवकरच सुटका)

कारचालकांची सुरक्षितता

कारचालकांना आता त्यांची ट्रीप, लोकेशन कुटुंबिय, मित्रमंडळींसोबत शेअर करता येणार आहे. ही सुविधा अॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इमरजेन्सी असिस्टंट बटण देण्यात आले असून कठीण प्रसंगात कारचालक त्याचा वापर करु शकतात. हे बटण दाबल्याने कायदा अंमलबजावणी संस्थेशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.