Twitter लवकरच युजर्सला उत्तम ट्वीटसाठी टिप देणार, लवकरच भेटीला येणार नवा ऑप्शन
Twitter Down | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

सोशल मीडियात सध्या परवली ठरलेले ट्विटर (Twitter) आता आपल्या युजर्ससाठी आणखी एक सेवा घेऊन येत आहे. युजर्सच्या प्रोफाईलवर ट्विटर लवकरच एक टिपींग बटन उपलब्ध करुन देणार आहे. ज्यामुळे लोक युजर्सला लाभ मिळवू देऊ शकतात. ज्यांची ट्विट उत्तम दर्जाची आणि नेमकी असतील अशा युजर्ससाठी त्याचे फॉलोअर्स त्याला आर्थिक लाभ मिळवू देऊ शकतील. अॅपचा शोधक जे मानचुन वौंग यांनी म्हटले आहे की, ट्विटर लोकांना इतर ट्विटर युजर्सना आर्थिक लाभ देण्याबाबत टिपींगसारखी सेवा उपलब्ध करुन देण्याचा पर्याय शोधला जातो आहे. मानसुच वौंगायांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, ट्विटर युजर्स प्रोफाईलवर एक टिपिंग बटन देऊ शकतो. ट्विटरने शुक्रवारी एका ट्विटमध्ये म्हटले की, ट्विटर यूजर प्रोफाईलवर टिप जार राईटवर काम करत आहे.

बँडकॅम्प, कॅश अॅप (स्वायर, एक जॅक डोरसी कंपनी) , पॅटर्न, पेपल आणि वेनमो च्या माध्यमातून टिपसाठी एक क्लिक बटन उपलब्ध करुन देऊन पर्याय दिला जाईल. वोंग यांनी मार्चमध्ये ट्विट केले होते की, ट्विटरवर आपलया क्लब हाऊस सारख्या सोशल ऑडिओ रुम स्पेससाठी टीप जार फिचर वर काम सुरु आहे. (हेही वाचा, Instagram Reels व्हिडिओ मोबाईलमध्ये कसे Save कराल? जाणून घ्या सोप्पी ट्रिक)

दरम्यान, ट्विटरने अद्याप चर्चिल्या जाणाऱ्या  नव्या पर्यायाबाबत अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. फेब्रुवारीमध्ये सोशल मीडियाने 'सुपर फॉलोअर' नावाच्या एका वादग्रस्त नव्या ट्विटर फीचरला आणले आहे. जे सोशल मीडियावर प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींच्या फॉलोअर्सना चिथावणी देत त्यांच्या ट्विट्सचे मुद्रिकरण देणे आणि त्या बदल्या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वाढविण्यास मदतगार ठरते आहे. नुकताच आरआयपी ट्विटर ट्रेंडमध्ये होता आणि त्यावरुन लोकांनी म्हटले की मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला एक एडिट बटन असायला पाहिजे.