जगभरात प्रसिद्ध असलेल्या 'ट्वीटर' (Twitter) या लोकप्रिय सोशल मीडीया प्लॅटफॉर्मची सूत्र हातात घेतल्यानंतर (Elon Musk) यांनी त्यामध्ये मोठे बदल जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या त्यापैकीच एका निर्णयामध्ये आता जगभरात Blue Tick व्हेरिफाईड ट्वीटर अकाऊंट धारकांना या ब्लू टीक साठी दरमहा 8 डॉलर मोजावे लागणार आहेत. त्यांचा मानस 20 डॉलर होता पण तो 8 डॉलर सध्या जाहीर केला आहे. सध्याच्या ट्वीटर मधील व्यवस्थेवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.
ट्वीटर मधील हा बदल जाहीर करताना प्रत्येक देशानुसार ब्लू टीक साठी दर कमी-जास्त असेल असेही त्यांनी म्हटलं आहे. पण हा दर मोजताना आता ट्वीटर युजर्सना नक्की याच्या बदल्यात काय मिळणार? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर घ्या जाणून!
ट्विटर कडून अकाऊंट विश्वसनीय असल्याचं दाखवण्यासाठी ब्लू टिक दिली जाते. सामान्यपणे सेलिब्रिटीज ज्यामध्ये खेळाडू, कलाकार, राजकारणी यांचा समावेश असू शकतो.राजकीय पक्षाचं अधिकृत अकाऊंट, काही पत्रकार यांना ही ब्लू टिक दिली जाते. त्यासाठी अकाऊंट चालू स्थितीत, योग्य माहिती देणारं आवश्यक असतं. ही टिक मिळवण्यासाठी ट्वीटर कडे विनंती केली जाऊ शकते. अजूनही ही पॉलिसी ट्वीटरवर आहे.
Elon Musk यांनी ट्वीटरची मालकी हाती घेतल्यानंतर या ब्लू टिक अकाऊंट्समध्ये मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते content creators ना उचित मोबदला देण्यासाठी आता ब्लू टिक अकाऊंट्स सशुल्क केल्याने ट्वीटर कडे पैसा निर्माण करण्यासाठी एक पर्याय सुरू होईल. केवळ जाहिरातदारांवर अवलंबून राहता येणार नाही. तसेच बोट्स आणि ट्रोल्स यांना रोखण्यासाठी देखील हा पर्याय मदत करू शकेल. हे देखील नक्की वाचा: Twitter Edit Option: एलॉन मस्क कडून भारतीयांना खास गिफ्ट, भारतीय ट्विटर वापर्कत्यांना आता ट्विट एडिट करता येणार.
सशुल्क सेवेमध्ये ट्वीटर युजर्सना काय मिळणार?
- जे सशुल्क सेवा घेतील त्यांना मेन्शंस, रिप्लाय आणि सर्च मध्ये प्राधान्य मिळणार.
यामुळे स्कॅम आणि स्पॅम दोन्हींचा सामना केला जाऊ शकतो.
- मोठे व्हिडिओ आणि ऑडिओ देखील पोस्ट करण्याची संधी मिळणार
- इतरांच्या तुलनेत कमी जाहिराती बघाव्या लागतील
- ट्वीटर सोबत काम करायचे असेल तर पेवॉल बायपास मिळणार
- नावाखाली सेकंडरी टॅग मिळेल. ज्याचा फायदा सध्या सेलिब्रिटी, राजकारण्यांना मिळत आहे.
दरम्यान ज्यांना ब्लू टिक व्हेरिफाईड अकाऊंटचा दर्जा यापूर्वीच मिळाला आहे पण जे दरमहा ही सेवा सशुल्क घेणार नाही त्यांच्या नावासमोरून त्यांना ब्लू टिक गमवावी लागणार आहे. एलॉन मास्क यांनी हे सारं ट्वीट करून जाहीर करतानाच ज्यांना तक्रारी करायच्या आहेत त्यांनी करत रहाव्यात असं म्हणत त्यांच्या या निर्णयावर ठाम असल्याचंही ठणकावून सांगितलं आहे. भारतामध्ये 8 डॉलर म्हणजे दर हा साधारण प्रतिमहिना 663 रूपयांच्या आसपास आहे.