लोकप्रिय मायक्रो-ब्लॉगिंग साइट (Micro Blogging Site Twitter) ट्विटर आता इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या मालकीची आहे. एलोन मस्क यांनी नुकतेच ट्विटर (Twitter) खरेदी केले आहे. तरी येणाऱ्या काळात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंसाईमध्ये (Micro Blogging Site Twitter) अनेक बदल पाहायला मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाचं आता ट्विटर कडून भारतीयांसाठी एक खास अपडेट (Update) लॉंच करण्यात आलं आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी ट्विट करून ट्विटरच्या या नव्या अपडेटबाबत माहिती दिली आहे. तरी ट्विटरच्या या नव्या अपडेटनुसार आता तुम्ही केलेला ट्विटमध्ये तुम्हाला काहीबदल करायचे असल्यास ते तुम्ही सहज करु शकणार आहे. कारण आता ट्विटरकडून एडिट बटण (Edit Button) हे नवं ऑप्शन जारी करण्यात आलं आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी याबाबत ट्विट करत सविस्तर माहिती दिली आहे.
विजय शेखर शर्मा यांनी एक ट्विट केलं आणि नंतर तेचं ट्विट एडिट करत म्हणजेच प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून ट्विट सहज एडिट केल्या जावू शकतं याबाबत माहिती दिली आहे. एका रिपोर्टनुसार हे फीचर ट्विटर आयफोन यूजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. परंतु, ते काही काळासाठी टेस्टिंग स्वरुपात उपलब्ध आहे. म्हणजेच अनरॉइड मोबाईल वापर्कत्यांना ट्विटरचं हे नवं फिचर सध्या वापरता येणार नाही आहे.
Here we go @TheSwamy :-) pic.twitter.com/hjc9qJutZb
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) October 28, 2022
Now this is an edited tweet !
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) October 28, 2022
तसेच सध्या ट्विट एडिट हे ऑप्शन अमेरिकेसह काही इतर देशांकरिता जारी करण्यात आलं आहे. सध्या भारतीयांना हे ऑप्शन वापरता येणार नाही आहे. तरी आता हे एडिट ऑप्शन भारतातील काही निवडक वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच तुम्ही एडिट केलेलं जुन्या ट्विटवर क्लिक केल्यास तुम्हाला तुमचं जुनं ट्विट सहज पाहता येईल, असं फिचर ट्विटर कडून लॉंच करण्यात आलं आहे.