Elon Musk Deal with Twitter: एलोन मस्क लवकरचं होणार ट्विटरचे नवीन मालक? 3.25 लाख कोटी रुपयांचा झाला करार
Elon Musk (Photo Credits: Getty Images)

Elon Musk Deal with Twitter: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले ट्विटर आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांची मायक्रो-ब्लॉगिंग साइट विकत घेण्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ताज्या अपडेटनुसार, ट्विटर एलोन मस्कच्या डीलला सहमती दर्शवत आहे. ट्विट इंक (TWTR.N) ने इलॉन मस्कच्या $43 अब्ज ऑफरवर पुनर्विचार केल्याचे म्हटले जात आहे. ट्विटरच्या मालकीसाठी 43 अब्ज डॉलरच्या कराराची पुष्टी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ट्विटर इंक (TWTR.N) इलॉन मस्कची सुमारे 43 अब्ज डॉलर रोख रकमेमध्ये विक्री करण्यास सहमती देण्यास तयार आहेत, अशी बातमी रॉयटर्सने दिली. कंपनी इलॉन मस्कला $54.20 प्रति शेअर रोखीने विकण्यासाठी कराराच्या जवळ आहे. हीच किंमत मस्कने सोशल मीडिया कंपनीला देऊ केली आहे. टेस्ला इंकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याला "सर्वोत्तम आणि अंतिम" म्हटले आहे. (हेही वाचा - Twitter: ट्विटरचे शेअरहोल्डर सौदी प्रिन्सने Elon Musk ची ऑफर फेटाळली; जाणून घ्या टेस्लाच्या सीइओची प्रतिक्रिया)

अहवालानुसार, ट्विटर सोमवारी नंतर 54.20 डॉलर प्रति शेअरसाठी एक करार जाहीर करू शकते. सूत्रांनी सांगितले की ट्विटरने मस्कसोबत केलेल्या करारांतर्गत 'गो-शॉप' तरतूद सुरक्षित करणे बाकी आहे, ज्यामुळे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इतर बोली लावण्यात येतील.

3 लाख कोटी रुपयांचा सौदा -

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्विटर कधीही 43 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 3.25 लाख कोटी रुपयांच्या या डीलला ग्रीन सिग्नल देऊ शकते. शेवटच्या क्षणी हा करार मोडीत निघण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. इलॉन मस्क यांनी आधीच सांगितले आहे की, त्यांनी ट्विटर खरेदी करण्यासाठी $ 46.5 बिलियन निधीची व्यवस्था केली आहे.

एलोन मस्क यांनी यापूर्वी खरेदी केला 9.2 टक्के हिस्सा -

एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये आधीच 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. अॅसेट मॅनेजमेंट कंपनी व्हॅनगार्ड ग्रुपचा ट्विटरमध्ये सर्वाधिक 10.3 टक्के हिस्सा आहे. याशिवाय सौदी अरेबियाचे प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांच्याकडे 5.2 टक्के शेअर्स आहेत. त्यांनी यापूर्वी एलोन मस्कची ऑफर नाकारली होती.