Twitter | (Photo Credit - File Image)

ट्विटर युजर्ससाठी (Twitter Users) अत्यंत धक्कादायक बातमी आहे. संशोधकांनी दावा केला आहे की, जगभरातील 200 दशलक्षाहून अधिक ट्विटर वापरकर्त्यांचे ईमेल पत्ते चोरीला गेले असून ते ऑनलाइन हॅकिंग फोरमवर पोस्ट करण्यात आले आहेत. हॅकर्सनी ट्विटर हॅक (Twitter Hack) करुन ही कृती केल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. इस्त्रायली सायबरसुरक्षा-नियंत्रण फर्म हडसन रॉकचे सह-संस्थापक अलोन गॅल यांनी याबाबत लिंक्डइनवर लिहिले आहे की, फार मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेली आहे. ज्यामुळे लक्ष्यित फिशिंग आणि डॉक्सिंग होण्याची शक्यता आहे.

अलोन गॅल यांनी 24 डिसेंबर रोजी गॅलने सोशल मीडियावर पहिल्यांदा याबाबत लिहीले. त्यानंतर त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. परंतू, ट्विटरने सुद्धा यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्या तारखेपासून उल्लंघन झालेबद्दल चौकशी केल्याचा अथवा इतर कोणताही प्रतिसाद दिला नाही. ट्विटरने या समस्येची चौकशी करण्यासाठी किंवा त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणती कारवाई केल्याचे पुढे आले नाही. तसेच, ती केली असेल तर अद्याप जाहीर झाले नाही. (हेही वाचा: ट्विटर कर्मचार्‍यांना घरून आणावा लागत आहे टॉयलेट पेपर; पैसे वाचवण्यासाठी Elon Musk यांचा नवा फंडा)

दरम्यान, हॅव आय बीन पॉन्ड या ब्रीच-नोटिफिकेशन साइटचे निर्माते ट्रॉय हंट यांनीही म्हटले आहे की, ट्विटर हॅक झाल्याचा रिपोर्ट खरा आहे. ऑनलाइन फोरमवर युजर्सच्या आयडीचे अनक स्क्रीनशॉटही हॅकर्सनी शेअर केले आहेत. अर्थात या स्क्रीनशॉटबाबत अधिक तपशील नाही. जसे की, स्क्रीनशॉटची ओळख, ते नेमके कोठे घेण्यात आले वगैरे वगैरे. काहींनी शंका व्यक्त केली आहे की, हा डेटा दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2021 मध्ये चोरीला गेला आहे.