Twitter Blue Tick Service: ट्विटर ब्लू सेवा (Twitter Blue Tick Service) 2 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा एलोन मस्क (Elon Musk) यांनी केली आहे. ट्विटरने आता ट्विटर ब्लू टिक सेवेला पैसे आकारणे सुरू केले आहे. यासाठी आता वापरकर्त्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. ही सेवा काही काळापूर्वी सुरू करण्यात आली होती. मात्र त्याच्या वाढत्या गैरवापरामुळे ती बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे आता ट्विटरचे चेक मार्क एकापेक्षा जास्त रंगांमध्ये दिसणार आहेत.
या रंगात येणार चेक मार्क -
ब्लू टिक पेड सेवा 2 डिसेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. यावेळी विविध व्यवसायातील लोकांना ट्विटर चेक मार्क तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये दिले जाईल. आता कंपनीच्या ट्विटर चेकमार्कचा रंग सोनेरी, सरकारसाठी राखाडी आणि सर्वसामान्यांसाठी निळा असणार आहे. (हेही वाचा - Twitter Suspended Account धारकाची ट्विटरने माफी मागावी का? Elon Musk यांनी मागितला थेट नेटकऱ्यांचा सल्ला)
एलॉन मस्क यांनी ट्विटर ब्लू टिकसाठी रक्कम भरण्याची घोषणा केली होती आणि नंतर त्याची अंमलबजावणीही केली होती. मात्र, काही त्रुटींमुळे अल्पावधीतचं त्यांना ही योजना पुढे ढकलावी लागली. यूएस आणि इतर देशांमध्ये ब्लू टिकसाठी $8 आणि भारतात या सेवेसाठी रु.720 चे सबस्क्रिप्शन शुल्क आकारले जाणार आहे.
ट्विटर पॉलिसीचे उल्लंघन करणाऱ्या लोकांसाठी ट्विटर लवकरच व्हर्च्युअल जेल शिक्षा फीचर लाँच करू शकते. व्हर्च्युअल जेलमध्ये युजरच्या प्रोफाईल फोटोच्या वर जेलचा लोगो बनवला जाईल आणि युजरच्या सर्व सेवा बंद केल्या जातील. तसेच युजर्संना जेलमधून त्यांचे अकाऊंट कधी मुक्त होईल याचीही माहिती दिली जाईल. (हेही वाचा - Twitter कर्मचाऱ्यांना मोठा झटका, Elon Musk यांनी कर्मचाऱ्यांचे भत्ते केले कमी)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट रिस्टोअर करण्यात आले आहे. आता उर्वरित निलंबित खातीही लवकरच पूर्ववत केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.