Twitter Down: भारत, UK, Japan, Canada सह जगभरात ट्वीटर सोबतच TweetDeck ठप्प
Twitter Down. (Photo Credits: File Image)

आज सकाळपासूनच भारतासह जगभरात ट्विटर (Twitter) बंद असल्याने युजर्सनी सोशल मीडियामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीटर सोबतच ट्वीट डेक (TweetDeck) देखील बंद असल्याने जगभरात सोशल मीडियामध्ये गोंधळाचं वातावरण होतं. काही वेळापूर्वीच ट्वीटरनेदेखील याबद्दल खुलासा केला आहे. अद्याप ट्वीटर बंद असल्यामागील कारण स्पष्ट झालं नसलं तरीही त्यामधील तांत्रिक बिघाडाचं कारण शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतासोबतच कॅनडा, जपान, युके या देशातील युजर्सनीही ट्वीटरची सेवा खंडित असल्याचं सांगितलं आहे. ट्विटरवर युजर्सना डीएम म्हणजे मेसेजेस, फोटो अपलोड करण्यामध्ये, व्हिडिओ आणि पोल्स अटॅच्ड करता येत नसल्याचं म्हटलं आहे.

भारतामध्ये TweetDeck सुरळीत काम करत नसल्याची तक्रार आज (2 ऑक्टोबर) सकाळपासून करण्यात आली आहे. ट्वीट डेक वरूनही अनेकदा थेट ट्विटरवर रिडिरेक्ट होत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. काही युजर्सना आज  सकाकपासून ट्वीटडेक वापरताना  "TweetDeck no longer has permission to access your main account. You will be logged out to prevent unauthorized access. " असा संदेश दाखवला जात आहे. Twitter Account हॅक झाल्यास काय कराल? जाणून घ्या काही सोप्या स्टेप्स

ट्विटर कडून देण्यात आलेली माहिती

ट्वीटर प्रमाणेच TweetDeck हा पर्याय देखील अनेक पत्रकार, मीडिया हाऊस वापरतात. मात्र त्यावरून कोणतेच ट्वीट केले नाही. मात्र लवकरात लवकर त्यामधील दोष शोधून काढला जाईल असं सांगण्यात आलं आहे.