मोबाईल क्रमांक 11 डिजिटचा करण्यासंदर्भातील रिपोर्ट्स बद्दल TRAI ने दिले 'हे' स्पष्टीकरण
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Photo)

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI यांनी मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 अंकी असणार असल्याची शिफारस केल्याचे काही रिपोर्टमधून सांगण्यात आले होते. परंतु ट्राय यांनी या प्रकरणी अधिक स्पष्टीकरण दिले आहे. ट्राय यांनी रविवारी असे म्हटले आहे की, आम्ही मोबाईल सर्विससाठी 11 अंकी क्रमांकाबाबत कोणतीच योजना तयार केली नाही आहे. त्यामुळे 11 अंकी क्रमांक मोबाईलसाठी करण्यात येणार नसून रिपोर्ट्समध्ये त्यांच्या शिफारसीबाबत चुकीची व्याख्या देण्यात आल्याचे ट्राय यांनी म्हटले आहे.

परंतु देशात 10 अंकीच क्रमांक सुरु राहणार असल्याचे ट्रायकडून अधिक स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही 11 अंकी मोबाईल क्रमांकासाठी आमची मान्यता नाही असे ही ट्राय यांनी म्हटले आहे. युजर्सला क्रमांकाच्या आधी शून्य लावणे असे ही म्हटले होते. तसेच क्रमांच्या आधी शून्य लावल्यास क्रमांकाच्या अंकात वाढ होणार नाही आहे. या डायलिंग पॅटर्नमधील बदलांमुळे भविष्यातील गरजांसाठी अतिरिक्त 2544 दशलक्ष संख्या जोडली जातील.(Google Maps चे नवे लोकेशन शेअरिंग फिचर; आता Exact Location शेअर करणे अधिक सोपे)

खरंतर, मीडिया रिपोर्ट्सम मध्ये असे म्हटले होते की, ट्राय यांनी सध्याचा मोबाईल क्रमांकांची संख्या 10 वरुन 11 होणार असल्याचा प्रस्ताव मांडला होताय त्याअंतर्गत लॅंन्डलाईन आणि मोबाईल सेवांसाठी युनिफाइड नंबरिंग प्लॅनचा समावेश आहे. या सिफारशीनुसार, लँन्डलाईनवरुन मोबाईल क्रमांकावर फोन लावल्यास त्याची संख्या 11 होणार आहे. तसेच क्रमांकांची सुरुवात 9 अंकी होणार असून यामुळे जवळजवळ 10 अरब मोबाईल नंबर दिले जाण्याची शक्यता आहे. ट्रायचे असे म्हणणे होते की, जर याचा 70 टक्के उपयोग केल्यास सात अरब मोबाईल क्रमांक उपलब्ध होऊ शकतात.