Threads App (Image Credit - Wikimedia Commons)

मेटाने (Meta) जुलै महिन्यात ट्विटरला टक्कर देण्यासाठी Threads App लाँच केले होते. युजर्सकरता यात अनेक अपडेट्स देखील देण्यात आले. मात्र आता X (Twitter) यूजर्सला देत असलेल्या भन्नाट अपडेट्समुळे Threads वापरणाऱ्या यूजर्सची संख्या कमी झाली आहे. कमी झालेल्या यूजर्सची संख्या वाढवण्यासाठी आता मेटाचे अधिकारी पुन्हा सज्ज झाले आहे. थ्रेड्स अॅपवर कंपनीने आता  पुन्हा एकदा नवीन फीचर लागू करणार आहे.  कंपनी 'कीवर्ड सर्च' (Keyword Search) फीचरवर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स कोणत्याही टॉपिकविषयी सहज सर्च करू शकतात.  (हेही वाचा -  Microplastics In Clouds: ढगांमध्ये प्रथमच आढळले मायक्रोप्लास्टिक, जपानी संशोधकांकडून पर्यावरणीय प्रभावाबद्दल चिंता व्यक्त)

सध्या थ्रेड्सचे हे फिचर  सध्या फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील वापरकर्त्यांसाठी लाइव्ह असून आता सर्वच थ्रेडस वापकर्त्यांना किवर्ड सर्च हे फिचर वापरता येणार आहे. या संबंधित मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे, आता लवकरच तुम्हाला Threads मध्ये 'कीवर्ड सर्च' फीचर मिळणार आहे. ज्याचा मदतीने तुम्ही कोणत्याही टॉपिकविषयी सहज सर्च करू शकणार आहात.

या सोबतच मेटाने आता थ्रेडसच वेब व्हर्जन देखील आणले आहे. थ्रेड्सचं चे वेब व्हर्जन चालवण्याकरता तुम्हाला गूगलवर www.threads.net टाईप करावे लागेल. गूगल व्यतिरिक्त हे MacOS वर देखील ही Website ओपन होऊ शकते. मेटा लवकरच या विषयावर लोकांना अपडेट करेल.