Threads App Launched: Meta ने लॉन्च केलं  Twitter विरूद्ध Threads App; युजर्स Instagram Accounts वरूनही करू शकणार लॉग इन
Threats | Instagram

मेटाच्या लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअररिंग प्लेटफॉर्म इंस्टाग्राम ने आपलं नवं टेक्स्ट बेस्ड कनवर्सेशन ऐप थ्रेड्स (Threads) लॉन्च केले आहे. मागील अनेक दिवसांपासून या अ‍ॅपची चर्चा होती. ट्वीटर विरूद्ध मेटा यांमधील कोल्ड वॉर सर्वश्रुत आहे. दरम्यान मेटा (Meta) कडून थ्रेड हे अ‍ॅप ट्वीटरला (Twitter) शह देण्यासाठी जारी केलं असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या जगात 100 पेक्षा जास्त देशांमध्ये थ्रेड्स अ‍ॅप डा ऊनलोडसाठी उपलब्ध आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.

ट्विटरचे प्रतिस्पर्धी अॅप लॉन्च करताना, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग ने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये इंस्टाग्रामचा अधिक चांगल्याप्रकारे वापर करण्यासोबतच हे अ‍ॅप टेक्स्ट, विचारांना शेअर करण्यासाठी देखील एक चांगला अनुभव म्हणून पाहिलं जाऊ शकतं. युजर्स त्यांच्या मनातील भावना या अ‍ॅप वर व्यक्त करू शकतात. त्यासाठी एका फ्रेंडली कम्युनिटीची गरज होती ती थ्रेड्स द्वारा पूर्ण केली जाऊ शकते.

अ‍ॅपल स्टोअर, गूगल प्ले स्टोअर वर हे अ‍ॅप डाऊनलोड साठी 100 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामचे हे अॅप वापरण्यासाठी इन्स्टाग्राम खाते असणे आवश्यक आहे. युजर्स थ्रेड्स अॅपवर त्यांचे इंस्टाग्राम नाव वापरू शकणार आहेत.

Mark Zuckerberg चं 11 वर्षांनी ट्वीट 

 

दरम्यान आज मार्क झुकरबर्गने देखील तब्बल 11 वर्षांनंतर ट्वीट केले आहे. कोणत्याही कॅप्शनविना त्याने एक मिम शेअर केले आहे. त्यामध्ये स्पायडरमॅनच्या वेशभूषेतील दोन व्यक्ती एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. थ्रेड्सच्या लॉन्च नंतर झुकरबर्गचं हे ट्वीट बरंच बोलकं आहे.