नव्या वर्षात WhatsApp वर येणार नवे फिचर्स, जाणून घ्या
(WhatsApp: Photo Credits: Pixabay)

जगप्रसिद्ध मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे त्यांच्या युजर्सचा प्रत्येक वेळी अपडेटेड फिचर्स देण्याचा प्रयत्न करते. तर येत्या नव्या वर्षात ही व्हॉट्सअॅपवर काही नवे फिचर्स येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरील चॅटिंग करणे अधिक मजेशीर होणार आहे. कंपनी कडून अद्यापही नव्या फिचर्सबाबत काम करत आहे. भारतात व्हॉट्सअपला अधिक पसंती दाखवली जात आहे. या नव्या फिचर्समध्ये फिंगरप्रिंट लॉ. ब्लॉक कन्टेन्ट, स्टेट्स प्रायव्हसी सारखे फिचर्स नव्या वर्षात युजर्सला व्हॉट्सअॅपमध्ये दिसून येणार आहेत.

>>डार्क मोड:

व्हॉट्सअॅप युजर्स गेल्या काही महिन्यांपासून डार्क मोडसाठी प्रतिक्षा करत आहेत. तसेच गेल्या महिन्यात या फिचर्सबाबत सांगण्यात आले होते. बीटा वर्जन मध्ये डार्क मोड तीन वेगळ्या ऑप्शन मध्ये येण्याची शक्यता आहे. डार्क मोड ऑन केल्यावर व्हॉट्सअॅप चॅटवरील बॅग्राउंट काळ्या रंगाचा आणि टेक्स सफेद रंगाचा दिसणार आहे.

>>फेस अनलॉक:

व्हॉट्सअॅपने नुकताच युजर्सला फिंगर प्रिंट हा ऑप्शन देत चॅट सिक्यॉर करण्याचा ऑप्शन आहे. मात्र नव्या वर्षात युजर्सला फेस अनलॉक असलेले फिचर्स येणार असल्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्स मध्ये या फिचर्सचे हिंट सुद्धा देण्यात आले आहेत. मात्र नेमके कधी हे फिचर्स लॉन्च केले जाऊ शकते याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

>>डिसअपियरिंग मेसेज:

कंपनी एक खास अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. जे युजर्सच्या द्वारे पाठवण्यात आलेले मेसेज किंवा मिळालेले मेसेज सेट केलेल्या वेळानंतर गायब होणार आहेत. डिसअपियरिंग मेसेज फिचर्स सुरुवातीला ग्रुप अॅडमिन वापरु शकणार आहे. हे फिचर सुरु करण्यासाठी सेटिंग्समध्ये युजर्सला देण्यात येणार आहे.(व्हॉट्सऍपमध्ये मोठा बदल; आता युजर्सला मिळणार ग्रुप इनव्हाइटसह हे 3 धमाकेदार फिचर्स)

>>फेसबुक पे:

व्हॉट्सअॅपने युपीआय-इनबेल्ड व्हॉट्सअॅप पेमेंट्स फिचर्स बाबत खुलासा केला आहे. मात्र हे फिचर अद्याप मोठ्या प्रमाणात रोल-आउट करण्यात आले नाही. रिपोर्ट्सनुसार, फेसबुक पेमेंट फिचर्स हे व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सला मिळण्याची शक्यता आहे.

तसेच व्हॉट्सऍप मध्ये आता युजर्सला आवश्यक कामांचे रिमाइंडर मिळायला सुरुवात होणार आहे. या फीचरद्वारे युजर्सला कोणतीही टास्क सेट करता येईल. या टास्कबाबत युजर्सला रिमाइंडर मिळेल. तसेच एका थर्ड पार्टी अ‍ॅपद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवरच महत्त्वाच्या कामाचे Reminder मिळतील. यासाठी युजर्सने स्मार्टफोनमध्ये Any.do हे अॅप असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप व्हॉट्सऍप अकाउंटशी जोडावे लागणार आहे.