Poco X3 Pro स्मार्टफोन 'या' दिवशी होणार भारतात लाँच; कंपनीने लॉन्चिंगच्या तारखेला दिला दुजोरा, जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स
Poco X3 (PC - Twitter)

चीनी स्मार्टफोन निर्माता Poco चा आगामी Poco X3 Pro स्मार्टफोन 30 मार्च रोजी भारतात लाँच होणार आहे. ही Poco F1 ची अपग्रेड केलेली आवृत्ती असेल. कंपनीने आगामी स्मार्टफोन लाँच केल्याचा खुलासा केला आहे. यासंदर्भात कंपनीने एक पोस्टर शेअर केले आहे. यात Unleash #Pro Performance या टॅग लाइनचा वापर करण्यात आला आहे. Poco X3 Pro स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च झालेल्या Poco X3 पेक्षा अधिक पावरफूल असेल. लीक झालेल्या अहवालानुसार, Poco X3 Pro Qualcomm Snapdragon 870 SoC चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.

Poco X3 स्पेसिफिकेशन्स -

Poco X3 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. ज्यास कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण मिळते. फोनचे डिस्पले 2340 × 1080 पिक्सल आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. जे गेमिंगच्या बाबतीत खूप चांगले असेल. Poco X3 स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरसह येईल. कंपनीच्या मते हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, जो स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरसह येतो. (Realme आणि Xiaomi ला टक्कर देण्यासाठी आला Made In India चा अॅन्ड्रॉइड स्मार्ट टीव्ही, 18 मार्चला होणार लॉन्च)

कॅमेरा -

POCO X3 स्मार्टफोनच्या मागील पॅनेलवर क्वाड कॅमेरा सेटअप असेल. त्याचा प्राथमिक सेन्सर 64 एमपीचा सोनी आयएमएक्स 682 असेल. याशिवाय 13 एमपी चे 119 एमपी अल्ट्रा वाइड एंगल लेन्स , 2 एमपी टेलीमाइक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर उपलब्ध असतील. फ्रंट पॅनेलवर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी त्याच फोनमध्ये 20 एमपीचा स्क्रीन कॅमेरा आहे.

बॅटरी -

POCO X3 मध्ये 6000 एमएएचची मोठी बॅटरी आहे, जी 33 डब्ल्यूएमएमटी वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह येते. कंपनीच्या दाव्यानुसार, फोन दोन दिवस सिंगल चार्जिंगसाठी वापरता येतो. POCO X3 स्मार्टफोनला पी P2i splash आणि डस्ट रजिस्टर कोटिंग देण्यात आले आहे. फोनमध्ये गेमरसाठी Turbo 3.0 सपोर्ट देण्यात आला आहे.