Tata Steel Layoffs: टाटा स्टीलकडून युके प्लांटमध्ये टाळेबंदीची घोषणा; 2,500 कर्मचारी गमावणार नोकरी
Photo Credit: Wikimedia Commons

Tata Steel Layoffs: टाटा ग्रुप (Tata)अंतर्गत येणाऱ्या टाटा स्टीलने त्यांच्या यूके (UK Layoffs)प्लांटमध्ये टाळेबंदीची घोषणा केली आहे. असे सीईओ नरेंद्रन यांनी म्हटले. टाटा ग्रुप अंतर्गत टाटा स्टील (Tata Steel Layoffs) ही भारतातील स्टील बनवणारी आघाडीची कंपनी आहे. जी युनायटेड किंगडममधील साउथ वेल्समध्ये कार्यरत आहे. टाटा स्टीलची वार्षिक 3 दशलक्ष टन (MTPA) स्टील उत्पादनाची क्षमता आहे. ज्यामुळे ते यूकेचे सर्वात मोठे स्टीलवर्क बनले आहे. साउथ वेल्समधील टाटा स्टीलच्या पोर्ट टॅलबोट येथे सुमारे 8,000 कर्मचारी कार्यरत आहेत. (हेही वाचा: Tesla Layoffs: टेस्ला टाळेबंदी, कंपनीच्या पुनर्रचनेत हजारो कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या)

इकॉनॉमिक टाइम्स इंडिया टाइम्सच्या अहवालानुसार, टाटा स्टीलच्या टाळेबंदीमुळे टाटा स्टीलच्या युनायटेड किंगडममधील कामकाजातील सुमारे 2,500 कामगारांवर त्याचा परिणाम होणार आहे. असे सीईओ टी व्ही नरेंद्रन यांनी सांगितले. टाटा स्टील यूकेचे सीईओ टी व्ही नरेंद्रन यांनी देखील सांगितले की संक्रमणाच्या टप्प्यामुळे टाळेबंदी अपरिहार्य असेल. यानंतर देशातील अनेक कामगार संघटनांमध्ये रोष पहायला मिळाला. त्यांनी टाटा स्टीलच्या या निर्णयाविरोधात करत निदर्शने केली.

अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे की, डीकार्बोनायझेशनचा एक भाग म्हणून, टाटा स्टीलने एक योजना आखली आहे. टी व्ही नरेंद्रन म्हणाले की,' टाटा स्टीलच्या टाळेबंदीमुळे 2,500 कामगार नोकऱ्या गमावतील. कामगार युनियन त्याबद्दल खूश नाही. ते पुढे म्हणाले की कंपनी सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी युनियनशी संवाद साधत आहे. तथापि, टाळेबंदी अपरिहार्य असेल'.

कंपनीचे सीईओ यावर जोर दिला की BF ते EAF मध्ये संक्रमण केल्याने ते जागतिक स्पर्धेत उत्तम काम करू शकतील. दरवर्षी सुमारे 5 दशलक्ष टन खर्च आणि CO2 कमी करण्यात मदत होईल.