व्हॉट्सअॅपवर लवकरच येईल Get More Stickers चा ऑप्शन ; चॅट करणे होईल अधिक मजेशीर
व्हॉट्सअॅप (Photo: Instagram)

इंस्टेंट मेसेजिंग प्लेटफॉर्म व्हॉट्सअॅप सतत नवनवे अपडेट युजर्ससाठी सादर करत असतं. लवकरच युजर्संना स्टिकर्स डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या बीटा युजर्सला हा पर्याय काही दिवसांपासून मिळत आहे. तर कंपनीने एक नवे स्टीकर पॅक Biscuit देखील अॅड केले आहेत. हे स्टीकर्स सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे.

WABetainfo च्या नुसार, व्हॉट्सअॅप युजर्संना बाहेरुन स्टीकर पॅक डाऊनलोड करण्याचा एक्सेस दिला जाईल. हे फिचर Get More Stickers या ऑप्शन्स द्वारे देण्यात येईल. यावर क्लिक केल्याने युजर गुगल प्ले स्टोरवर रिडिरेक्ट होईल. यामुळे युजर्स दुसऱ्या अॅप्सकडून स्टीकर डाऊनलोड करु शकतील. वृत्तानुसार, कंपनी व्हॉट्सअॅप स्टीकर्ससाठी नवीन अॅप देखील लॉन्च करु शकते.

याशिवाय लवकरच अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन युजर्सला रिप्लायचा नवा पर्याय व्हॉट्सअॅपकडून उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅप iOS प्रमाणे स्वाईप टू रिप्लाय असा ऑप्शन सादर करणार आहे. हे अॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात येईल. या फिचरअंतर्गत युजर्स मेसेज उजव्या बाजूला स्वाईप करुन त्याचा रिप्लाय करु शकतात. हे फिचर सर्वात प्रथम WABetaInfo वर स्पॉट करण्यात आले.

व्हॉट्सअॅप बीटा बिल्डसला ट्रॅक करणारे ट्विटर अकाऊंट WABetaInfo वर सर्वात आधी पाहण्यात आले. WABetaInfo ने ट्विट करुन सांगितले की, "व्हॉट्सअॅप स्वाईप टू रिप्लाय फिचर अॅन्ड्रॉईड बीटा व्हर्जन 2.18.300 वर टेस्ट करत रहा."

ट्विटमध्ये GIF इमेज दिसेल. हे अॅन्ड्रॉईड डिव्हाईसमध्ये हे फिचर कसे काम करते, हे यात दाखवण्यात आले आहे. सध्या अॅन्ड्रॉईड युजर्स फक्त मेसेजवर टॅप करुनच रिप्लाय करु शकतात.