Swiggy | Representative Image | (Photo Credits: Swiggy @swiggy_in Twitter)

आता जेवण बनावट येत नसलं तरी प्रत्येक जण हमखास स्विगी, झोमॅटो किंवा उबर इट्स या ऍप्सवरून कधीही आणि कुठेही ऑर्डर करू शकतो. परंतु, स्विगी या ऍपने नुकतीच अशी काही माहिती प्रदर्शित केली आहे, जी वाचून तुम्हीही व्हाल थक्क. स्विगीने सांगितल्यानुसार, या ऍपवरून सर्वात जास्त चिकन बिरयानी ऑर्डर केली जाते.

स्विगी ऍपने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यांदरम्या देशभरात सर्वात जास्त ऑर्डर या चिकन बिरयाणीच्या घेण्यात आल्या होत्या. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक मिनिटाला जवळपास 95 ऑर्डस या बिर्याणीच्याच येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Christmas Sale: विवो कंपनीचे व्ही 17, व्ही 17 प्रो, व्ही 15 प्रो यांच्यासह 'या' 5 स्मार्टफोनच्या खरेदीवर मिळणार विशेष सूट

त्यामुळे त्यांच्या यादीत बिर्याणीला पहिले स्थान मिळाले आहे तर सर्वात जास्त ऑर्डसच्या दुसऱ्या स्थानावर आहे मसाला डोसा तर तिसऱ्य़ा स्थानावर आहे पनीर बटर मसाला हे पदार्थ. विशेष म्हणजे याच वर्षी नाही तर सलग मागील तीन वर्षांपासून सर्वात सर्वात आवडती डिश म्हणून चिकन बिर्यानीलाच सर्वात जास्त पसंती मिळालेली पाहायला मिळत आहे. तर स्विगीने जाहीर केलेल्या अहवालानुसार डेझर्ट म्हणजेच गोड पदार्थांमध्ये गुलाबजामला सर्वात जास्त पसंती मिळाली आहे आणि दुसऱ्या स्थानावर आहे फालुदा तर तिसऱ्या स्थानावर मूगडाळीचा हलवायला पसंती मिळाली.