Elyments App (PC- play.google.com)

गेल्या आठड्यात केंद्र सरकारने भारतात 59 चीनी अॅपवर (Chinese Apps) बंदी घातली आहे. यात टिकटॉकसह युसी ब्राउजर, कॅम स्कॅनरसह आणखी अनेक लोकप्रिय अॅपचा समावेश आहे. चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर सोशल मीडिया वापरासाठी भारतात स्वदेशी अ‍ॅपची मोहिम सुरु झाली आहे. श्री. श्री. रविशंकर (Ravi Shankar) यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगने एक भारतीय सोशल मीडिया सुपर अ‍ॅप ‘इलायमेंट्स’ (Elyments App) तयार केले आहे.

‘इलायमेंट्स’ हे अॅप अनेक तज्ञांनी मिळून बनवलं आहे. या अॅपचं विशेष म्हणजे वेगवेगळ्या सोशल मीडिया अ‍ॅपमध्ये जे सर्व फिचर्स आहेत, ते सर्व फिचर्स या एकाचं अ‍ॅपमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या अॅपमध्ये सोशल कनेक्टिव्हिटीसोबत चॅटिंग, ऑडियो-व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप कॉलिंग, ई-पेमेंट, ई-कॉमर्ससारखे फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या अॅपचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे अ‍ॅप 8 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे. (हेही वाचा - भारतात TikTok बॅन केल्यानंतर Moj व्हिडिओ अ‍ॅप लोकप्रिय, 10 लाखांपेक्षा अधिक युजर्सने केले डाऊनलोड)

दरम्यान, या अॅपमध्ये यूजर्सच्या डाटाची पूर्ण सुरक्षितता पाळण्यात आली आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्संची माहिती सुरक्षित राहण्यासाठी तज्ञांनी विशेष काळजी घेतली आहे. गुगल प्ले स्टोअरवर ‘इलायमेंट्स’ हे अॅप उपलब्ध आहे. आतापर्यंत 1 लाखाहून अधिक लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या पहिल्या स्वदेशी सोशल मीडिया अ‍ॅपचं लाँचिंग केलं. यावेळी श्री श्री रविशंकर उपस्थित होते.