Sony RX0 II Premium Compact Camera Launched in India: सोनी (Sony) कंपनीने आपला बहुचर्चीत ठरलेला कॉम्पॅक्ट कॅमेरा (Compact Camera) रेंजची लेटेस्ट एडीशन Sony RX0 II नावाने भारतीय बाजारात नुकताच लॉन्च केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा कॅमेरा हा जगातील सर्वात छोटा आणि वजनाला कमी असलेला अल्ट्रा प्रीमियम कॉम्पॅक्ट कैमरा आहे. साधारण 132 ग्रॅम वजनाचा हा कॅमेरा सोना RX0 कॅमेऱ्याचे अपग्रेड व्हर्जन आहे. याचे डायमेंशन केवळ 59mm x 40.5mm x 35mm इतके आहे. या छोट्या कॅमेऱ्याची फीचर्स लिस्ट बरीच लांबलचक आहे.
Sony RX0 II Premium Compact Camera फिचर्स
- स्क्रीन - 180 डिग्री
- वॉटरप्रफ (IPX8)
- डस्टप्रूफ (IP6X)
- शॉकप्रूफ आणि क्रशप्रूफ (200 किलो पर्यंतचा दाब सहन करण्याची क्षमता.)
विक्री कधीपासून सुरु
सोनी RX0 II मध्ये 15.3 मेगापिक्सलचा एक्समोर आरसी सीमोस इमेज सेन्सर आणि अॅडवान्स्ड BIONZ X इमेंज प्रोसेसिंग इंजिन युक्त आहे. जो जबरदस्त फोटोशूट करतो.
मार्चमध्ये जगभरात लॉन्च झालेल्या सोनी RX0 II ची किंमत 48,000 रुपये होती. सोनी RX0 प्रमाणे यातही 4 के 30 पिक्सल व्हिडिओ शूट करता येऊ शकते. (हेही वाचा, सोनीने लॉन्च केला हाय झूम कॅमेरा ; हे आहेत खास फिचर्स)
चालताना ऑब्जेक्टला फुटेज घेण्यासाठी यात इन-बॉडी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलाइजेशन फीचर देण्यात आले आहे. याशवाय यात 100fps पर्यंत सूपर स्लो मोशन रेकॉर्डिंग, अनकम्प्रेस्ड 4 K एचडीएमआय आउटपुट आणि प्रॉक्सी मूव्ही रेकॉर्डिंग यांसारखे फिचर्स मिळतात.
कुठे मिळेल?
सोनी RX0 II ची किंमत 57,990 रुपए आहे. याची व्रिकी 15 जुलै पासून सुरु होईल. सोनी सेंटर, अल्फा फ्लॅगशिप, सोनी ऑथोराइज्ड डीलर आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोरमध्ये तुम्हाला हा कॅमेरा मिळू शकतो.