Sony Bravia 32W830 Smart TV भारतात लाँच, यामध्ये मिळणार 'ही' खास वैशिष्ट्ये
Sony TV Representative Image (Photo Credit: Sony Website)

सोनी (Sony) कंपनीने भारतात आपला नवा स्मार्ट टिव्ही लाँच केला आहे. Sony Bravia 32W830 Smart TV भारतात लाँच झाला असून यात खूपच आकर्षक अशी वैशिष्ट्ये आहेत. 32 इंचाच्या या स्मार्ट टिव्हीमध्ये HD Ready डिस्प्ले आणि Google Chromecast सारखे फिचर्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर यात Google Assistant व्हॉईस कंट्रोल सारखे फिचर्सही देण्यात आले आहेत. या स्मार्टटिव्हीची किंमत 31,900 रुपये आहे. हा स्मार्ट टीव्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

या स्मार्टटिव्हीच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात Google Assistant व्हॉईस कंट्रोल सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. टीव्हीला रिमोट अथवा व्हॉईस कंट्रोलद्वारे तुम्ही वापरू शकता. यात स्मार्ट स्पीकर्स दिले आहेत. हा टीव्ही यूजरची व्हॉईस कमांड फॉलो करतो आणि टीव्ही फंक्शन ऑपरेट करतो.हेदेखील वाचा- Facebook घेऊन येत आहे Dating App , फक्त 4 मिनिटांत मिळेल इच्छित जीवनसाथी ! जाणून घ्या कसे असेल अ‍ॅप

या स्मार्ट टिव्हीमध्ये 32 इंचाची HD Ready डिस्प्ले दिला आहे, जो 1366x768 पिक्सेल रिजोल्युशनसह येतो. यात 1080p रिजोल्युशनचा व्हिडिओदेखील तुम्ही पाहू शकता. यात HDR, HDR10 आणि HLG सारखे फॉर्मेट्स सपोर्ट फिचर मिळतो.

कनेक्टिव्हिटीसाठी या टीव्हीमध्ये HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, एक 3.5mm ऑडियो जॅक दिला आहे. त्याचबरोबर यात Wi-Fi, Bluetooth 4.2 ला सपोर्ट करतो. हा Android TV ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो.

दरम्यान गेल्या वर्षी सोनी कंपनीने चक्क वेअरबेल पॉकेट एसी बनवण्याची किमया साधली होती. आता Reon Pocket Wearable Air Conditioner  हा एसी लॉन्च देखील करण्यात आला आहे. बाजारात ग्राहकांसाठी तो उपलब्ध देखील करण्यात आला आहे.