गेल्या काही वर्षांपासून स्मार्टफोनचा (Smart Phone) वापर प्रचंड वाढला आहे. आजकाल अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे जितका फायदा झाला आहे तितकेच नुकसानही होत आहे. स्मार्टफोनमुळे नैसर्गिक परस्परसंवाद नष्ट होत आहेत. सोमवारी एका नवीन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 10 पैकी 8 विवाहित भारतीयांचा असा विश्वास आहे की मोबाईलचा अतिवापर त्यांच्या नातेसंबंधांवर मोठा परिणाम करत आहे.
विशेष म्हणजे, 67 टक्के लोकांनी मान्य केले की, ते आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवत असतानाही फोनचा वापर करतात. अभ्यासानुसार, स्मार्टफोनच्या अत्यधिक वापरामुळे, 66 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, त्यांचे नातेसंबंध कमकुवत झाले आहेत. व्हिवो (Vivo) ने सायबरमीडिया रिसर्च (CMR) च्या सहकार्याने केलेल्या अभ्यासानुसार, स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मानसिक बदल देखील होतात, 70 टक्के लोकांनी कबूल केले की, त्यांचे जोडीदार स्मार्टफोनमध्ये व्यस्त असल्याने आपली प्रचंड चिडचिड होते.
#Smartphones are killing natural conversations between couples and a new study said more than 8 in 10 married Indians feel excessive use of mobiles is deeply hurting their relationships. pic.twitter.com/ieir5fBHfM
— IANS (@ians_india) December 12, 2022
अभ्यासानुसार, विवाहित जोडपे त्यांच्या जोडीदाराशी संभाषण करताना फोनमुळे विचलित होतात, तर 69 टक्के प्रतिसादकर्त्यांनी कबूल केले की स्मार्टफोनमुळे ते त्यांच्या जोडीदाराशी संभाषण करताना पूर्ण लक्ष देत नाहीत. यातील दिलासादायक बाब म्हणजे, भारतीय त्यांची ही समस्या मान्य करत आहेत आणि त्यांचे स्मार्टफोनबाबतचे वर्तन बदलण्यास तयार आहेत. अभ्यासात असे म्हटले आहे की, सुमारे 88 टक्के लोकांना त्यांच्या जोडीदाराशी अर्थपूर्ण संभाषणासाठी अधिक मोकळा वेळ हवा असतो. (हेही वाचा: Redmi, Realme, Oppo सह विविध कंपनीच्या स्मार्ट फोन्सच्या दरात मोठी कपात)
दरम्यान, व्हिवो इंडियाचे ब्रँड स्ट्रॅटेजी हेड योगेंद्र श्रीरामुला म्हणाले, ‘आजच्या जीवनात स्मार्टफोनचे महत्त्व निर्विवाद आहे, परंतु अतिवापराबाबत वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.' भारतात 1.2 अब्ज मोबाइल फोन वापरकर्ते आणि 600 दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत.