WhatsApp New Privacy Policy मुळे Signal, Telegram ला मिळाले 40 लाख नवे युजर्स
Signal and Telegram (Photo Credits: Twitter)

व्हॉट्सअॅपने (WhatsApp) गेल्या आठवड्यापासून भारतातील 40 कोटी युजर्संना आपल्या नवीन पॉलिसीबद्दल (New Privacy Policy) इन-अॅप नोटीफिकेशन्स पाठवण्यास सुरुवात केली. जर युजर्संनी हे नोटीफिकेशन अॅस्पेट केले नाही तर 8 फेब्रुवारीपासून त्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद होईल, असे व्हॉट्सअॅपने सांगितले. या बातमीमुळे सिग्नल (Signal) आणि टेलीग्राम (Telegram) यांसारख्या अॅप्संना उदंड प्रतिसाद मिळत आहे. (WhatsApp Privacy Controversy: प्रायव्हसी वादावर व्हाट्सअॅपकडून खुलासा, मित्र, कुटुंबीयांसोबतचे चॅटींग सुरक्षित)

गेल्या 2 दिवासामध्ये सिग्नल आणि टेलीग्राम या अॅप्सवर 40 लाखाहून अधिक युजर्संनी रजिस्ट्रेशन केले आहे. सेन्सर टॉवर या फर्मच्या अॅप अॅनालिटीस्टस यांनी दिलेल्या डेटानुसार, जानेवारी 6 ते जानेवारी 10 या कालावधीमध्ये 23 लाख नवीन युजर्सनी सिग्नल अॅप डाऊनलोड केला. तर 16 लाखांहून अधिक युजर्सनी टेलिग्राम अॅप डाऊनलोड केला आहे. तसंच 6 ते 10 जानेवारी या कालावधीत व्हॉट्सअॅपचे डाऊनलोड 35 टक्कांनी कमी झाले आहे. व्हॉट्सअॅपने आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी रिलीज केल्यानंतर डाऊनलोडच्या आकड्यांमध्ये इतका मोठा फेरबदल झाला.

व्हॉट्सअॅपला पर्यायी अॅप शोधत युजर्सनी सिग्नल अॅपकडे आपला मोर्चा वळवला. परंतु, अचानक आलेल्या लाखो युजर्समुळे सिग्नल सर्व्हर ओव्हरलोड झाले. खूप सारे नवीन युजर्स सिग्नल अॅपला जॉईन करत असल्यामुळे तुमचा व्हेरिफिकेशन कोड येण्यास विलंब होईल. असे नवीन युजर्संना रजिस्ट्रेशन करताना दिसत होते. आम्ही सर्व्हर इश्यू लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सिग्नलने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सांगितले.

लोकांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे सिग्नल अॅप हे अॅप स्टोअरच्या फ्री अॅप कॅटेगरीमध्ये पहिल्या स्थानावर जावून पोहचले आहे. सिग्नल अॅपने व्हॉट्सअॅपला मागे टाकून अॅप स्टोअरवर प्रथम क्रमांक पटकवल्याचा स्क्रिनशॉर्ट सिग्नल अॅपच्या ट्विटर हँडवर शेअर केला होता. तुमच्या प्रतिसादामुळे बघा काय घडले आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले होते.

भारतासोबतच जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, फिमलँड, हांगकॉंग आणि स्विर्झलँड या देशांमध्ये सुद्धा सिग्नल अॅपच्या सर्वाधिक डाऊनलोड्स झाल्या. यापूर्वी टेसला चे सीईओ Elon Musk यांनीआपल्या ट्विटमध्ये सिग्नल अॅप वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर सिग्नल अॅपवर मोठ्या प्रमाणात नव्या युजर्सचे रजिस्ट्रेशन झाले होते.