Shocking! रात्री मोबाईल फोन चार्जरला लावून झोपली होती तरुणी; विजेचा धक्का बसून झाला मृत्यू
स्मार्टफोन (Photo Credits: Pixabay)

बरेच लोक असे आहेत, जे अनेक तास आपला फोन चार्जरला (Charger) लावतात किंवा काही लोक असे आहेत जे रात्री आपला मोबाईल फोन चार्जरवर ठेऊन तसेच झोपतात. तुम्ही देखील अशा गोष्टी करत असाल तर वेळीच सावाध व्हा, कारण ही गोष्ट तुमच्या जीवाशी खेळणारी ठरू शकते. फोन चार्जिंगशी निगडीत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक 17 वर्षीय तरुणी रात्री मोबाईल चार्जिंगला लावून झोपली होती, मात्र विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे प्रकरण कंबोडियातून समोर आले आहे. खोर्न स्रे पोव असे या तरुणीचे नाव असून ती क्रेती प्रांतातील रहिवासी होती.

खोर्न सेरे पोवने तिचा मोबाईल फोन चार्जिंगला ठेवला होता आणि त्यावर ती झोपली होती. यानंतर तिला विजेचा शॉक लागून तिचा मृत्यू झाला. ती व्यवसायाने अनुवादक होती आणि सोन्याच्या खाणकाम कंपनीत चीनी भाषांतर कंपनी म्हणून काम करत होती. रिपोर्ट्सनुसार, खोर्न अंघोळ करून बेडवर पडली होती आणि त्यावेळी तिचा मोबाईल चार्जिंगला होता. यादरम्यान तिच्या मोबाईलचा टॉर्चही चालू होता.

जेव्हा तिला झोप लागली तेव्हा चुकून फोन तिच्या अंगाखाली दबला गेला आणि त्यानंतर अचानक तिला विजेचा धक्का बसला व तिचा मृत्यू झाला. ही घटना 27 जुलैची आहे. ही बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोक मोबाईल चार्ज करताना काळजी घेण्यास सांगत आहेत. अनेक लोक असेही म्हणतात की मोबाईल कंपन्यांनी आपली उत्पादने अशा प्रकारे विकसित करावी जेणेकरून चार्जिंग दरम्यान करंटचा धोका नसेल. (हेही वाचा: मोबाईल रिचार्जच्या दरात मोठे बदल, आता फक्त 109 रुपयांत 30 दिवसांची वैधता)

भारतातही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन किंवा फोन चार्जिंग करताना अपघात होऊन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावरून मोबाईल वापरकर्त्यांना सल्ला दिला जातो की मोबाईल चार्ज होताच तो चार्जरमधून ताबडतोब काढून टाका.