मोबाईल (Mobile) यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. मोबाईल रिचार्जच्या (Mobile Recharge) दरात मोठे बदल झाले असुन जर तुम्ही एअरटेल (Airtel) युजर असाल तर तुम्हाला या नवीन दरांचा लाभ घेता येणार आहे. एअरटेलने आपल्या यूजर्सला मोठी भेट दिली आहे. एअरटेल (Airtel User) कंपनीने आपल्या यूजर्ससाठी दोन नवे प्लान आणले आहेत. यातील एक प्लान 109 रुपयाचा आहे ज्याची वैधता 30 दिवसाची आहे तर दुसरा प्लान 111 रुपयाचा आहे, ज्यात धारकास संपूर्ण महिन्याची वैधता मिळते. तुम्ही महिनाभराचा रिचार्ज करणार असाल तर हे दोन्ही प्लान उत्तम पर्याय ठरु शकतात.
एअरटेल बरोबरच जिओने (Jio) देखील आपल्या नवीन प्लाची घोषणा केली आहे. पण त्यासाठी तुम्ही जिओचे 4 जी धारक असण अनिवार्य आहे. 100 रुपयाच्या घरातील जिओचे तीन वेगवेगळे प्लान आहेत. पहिला प्लान 75 रुपयाचा आहे ज्यात अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited Calling), 50 एसएमएस (SMS), जिओ अॅप सर्विस (Jio App Service) सह डेली 100 एमबी डेटा (MB Data) सोबत 200 एमबी अतिरिक्त डेटा फ्री डेटा मिळतो पण या प्लानची वैधता फक्त 23 दिवसांची आहे. तर दुसरा प्लान 91 रुपयाचा आहे. 91 रुपयाच्या प्लानध्ये 28 दिवसाची वैधता आहे ज्यात 50 एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग सह 100 एमबी रोज डेटा प्लस 200 एमबी अतिरिक्त डेटा दिला जातो. तिसरा प्लान 125 रुपयाचा आहे या प्लानमध्ये रोज 500 एमबी डेटा म्हणजे एकूण 1.5 जीबी डेटा , सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस सोबत जिओ अॅप मिळते. (हे ही वाचा:-WhatsApp New Feature: व्हॉट्सअॅपने आणणार नवीन फीचर; आता यूजर्स PC, Laptop आणि Phone वर डाउनलोड करु शकणार चॅट बॅकअप)
जिओ, एअरटेल, आयडिया (Idea) या कंपन्या कायमच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेवून येताना दिसतात. कमी पैशात जास्त वैधतेचा प्लान कुठला या बद्दलची माहिती या टेलिकॉम कंपन्याकडून त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून देण्यात येते. ग्राहकांनी त्यांच्यासाठी सोईस्यकर पर्याय निवडून रिचार्ज करता यावा यासाठी कंपनी असे नवनवीन ऑफऱ घेवून येताना दिसतात.