गेल्या काही वर्षांमधील तंत्रज्ञान क्षेत्रात झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. मोबाईल विश्वात 2 जी पासून सुरु झालेली सेवा 5 जी पर्यंत पोहोचली आहे. भारतात अजून 5 जीच्या चाचण्या चालू आहेत, असे असताना चीनच्या शांघाई (Shanghai) जिल्ह्यात 5 जी कव्हरेज तसेच गिगाबाईट नेटवर्क सुरु झाले असल्याची माहिती मिळत आहे. अशाप्रकारे 5 जी नेटवर्क सुरु करणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. चीनी सरकारी वृतपत्र चायना डेलीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून 5 जीच्या चाचण्या सुरु होत्या. त्या पूर्ण झाल्या असून गेल्या तीन महिन्यापासून 5 जी नेटवर्क वितरीत करायला सुरुवात झाली होती. आता शनिवारपासून अधिकृतरीत्या ही सेवा सुरु झाली आहे. 5 जीसेवेमुळे 4 जी पेक्षा 10 पट जास्त वेगाने इंटरनेटचा फायदा ग्राहक घेऊन शकणार आहेत. 5G मुळे केवळ इंटरनेट स्पीडच अपग्रेड होणार नाही, तर सोबतच नव्या टेक्नॉलजीचाही प्रारंभ होणार आहे. 5G युगात लाखो डिव्हायसेस एकत्र येतील आणि एकमोकांसोबत व्यवहारही करतील. (हेही वाचा: 2G, 3G वापरून कंटाळा आला 4G झाले जुने; आता 5G येताच गतीमान होईल जगणे)
सर्वात अगोदर आपल्या देशात 5 जी सुरु व्हावे यासाठी चीनसह अमेरिका, फिनलंड, नेदरलँड्स या देशात स्पर्धा होती. चीनने 5 जी टेस्टिंगसाठी चीनी सरकारी दूरसंचार कंपनी चायना मोबाईलचे सहकार्य घेऊन ही सेवा सुरु केली. शांघाईच्या होंगकोउ येथे या नेटवर्कची सुरवात उपमहापौर वु क्विंग (Wu Qing) यांनी पहिला फाईव्ह जी व्हिडीओ कॉल लावून केली. युजर सिमकार्ड न बदलता या सेवेचा लाभ घेऊ सहकार आहेत.