बॉलीवुड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा काही वर्षांपूर्वी हिट अँड रन (Hit-and-Run Case) प्रकरणामुळे चर्चेत आला होता. अलिकडेच त्या प्रकरणाचा निकाल लागला. त्यावेळीही या प्रकरणाची चर्चा झाली. दरम्यान, आता पुन्हा नव्याने सलमान खान आणि हे प्रकरण चर्चेत आले आहे. अर्थात, या प्रकरणाचा तसा थेट संबंध नाही परंतू, एका मोबाईल गेममुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे इतकेच. सेल्मन भोई, द गेम हीरो (Selmon Bhoi, the game) असे या गेमचे नाव आहे. पण, या गेममध्ये सलमान असे कोणतेही चुकीचे काम करताना दिसत नाहीत हे महत्त्वाचे. हा गेम Google Play Store वर उपलब्ध आहे. पैरोडी स्टूडियो द्वारे या गेमचे प्रमोशन केले जात आहे. हा स्टुडीओ पुण्यात असून या गेमला 4.7 रेटींग मिळाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेम एका डिस्क्लेमरने सुरु होतो. हा खेळ केवळ एका काल्पनीक आधारावर निर्मिती केला आहे. त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. दरम्यान, या खेळाच्या सुरुवातीला 'सेल्मन भोई' ड्रिंक करताना आणि मध्यरात्री वाहन चालवताना पाहायला मिळतो. (हेही वाचा, PUBG खेळण्यासाठी आईच्या खात्यातून 10 लाख रुपयांची चोरी, मुंबई येथील अल्पवयीन मुलाचे कृत्य)
दरम्यान, गेममध्ये एकूण तीन लेवल आहेत. पहिली ग्रिन लेवल- या लेवलमध्ये सेल्मन भाईला आपली कार काही विचित्र ग्रहांमधून फिरवावी लागते. जिथे एका पार्कमध्ये हिरण आणि एलियन्स यांच्यावरुन त्याला धावावे लागते. बर्फाचे सेवल लेवल- या लेवलमध्ये सेल्मन भाईला काही धाडशी गोष्टी काराव्या लागतात. ज्यात पाहायला मिळते की त्याचा सामना एलियन्स, पोलर बियर आणि पेंगुइन आदींसोबत होतो. प्लेयरला पोलर बियर आणि एलियन्सला मारायचे असते. तसेच, पेंगुइनोंना वाचविण्यासाठी सेल्मन भाईला प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. डेजर्ट लेव्हल- खिलाडी सेल्मन भाई रेगिस्तानमध्ये आपली कार चालवतात. जेथे प्रत्येक ठिकाणी विंचू, साप, उंट आणि केक्टींचा सामना करावा लागतो. रिकस्तानी भूमित पाहायला मिळणाऱ्या सर्व प्राण्यांवरुन सेल्मन भाईला हवाई सफर करावी लागते.
जर आपण नवी लेवल पार केली तर आपण आपली कार अपग्रेड करु शकता आणि लीडरबोर्डच्या टॉपवर होण्याची शक्यताही वाढवू शकता. सेल्मन भाई गेम 3 मध्ये खिलाडीला सर्व एलियन्स ( जे सर्वसाधारणपणे लोक आणि जनावरांसारखे दिसतात) ला मारण्याचा प्रयत्न करावा लागतो. एका एलियन्स मारल्यास एक गुण मिळतो. या खेळात अधिकाधिक गूण करायचे असतात. सेल्मन भाई गेम तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय होताना दिसतो आहे. . Play Store ने म्हटले आहे की, हा गेम पहिल्यांदा 10,000 पेक्षाही अधिक वेळा डाऊनलोड करण्या आला आहे.