PUBG खेळण्यासाठी आईच्या खात्यातून 10 लाख रुपयांची चोरी, मुंबई येथील अल्पवयीन मुलाचे कृत्य
PUBG Mobile India (Photo Credits: File Image)

पबजी गेम (PUBG Game) खेळण्यासाठी ऑनलाईन व्यवहार (Online Transaction) करण्यासाठी मुंबई येथील एका अल्पवयीन मुलाने आपल्या आईच्या खात्यातून चक्क 10 लाख रुपये चोरी केले आहेत. आपली चोरी उघडकीस आल्यावर घरातून ओरडा मिळेल या भीतीपोठी हा 16 वर्षीय मुलगा घरातून पळून गेला. घरातून पळालेल्या मुलाला मुंबई पोलिसांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) दुपारी अंधेरी (पूर्व) (Andheri (East) येथील महाकाली केव्स (Mahakali Caves Locality) परिसरातून ताब्यात घेण्यात आले. सध्या या मुलाला त्याच्या आईवडीलांकडे सोपविण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी सायंकाळी या मुलाबाबत पहिल्यांदा माहिती पुढे आली. जेव्हा या मुलाच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मुलगा हरविल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलाचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. तपासादरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, या मुलाला पाठिमागील महिन्यापासून पबजी खेळण्याचा नाद जडला होता. (हेही वाचा, Battlegrounds Mobile India गेम खेळण्यासाठी 'या' मोबाईल स्पेसिफिकेशन्सची गरज; जाणून घ्या सविस्तर)

पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आले की, संबंधीत मुलाने पबजी खेळण्याच्या नादात पाठिमागील महिन्यापासून आपल्या आईच्या खात्यातून 10 लाख रुपये उडवले होते. अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा या मुलाच्या पालकांना ऑनलाईन देवाण-घेवाणीबाबत माहिती मिळाली तेव्हा या मुलाला जोरात ओरडा दिला. त्यानंतर या मुलाने एक चिठ्ठी लिहीली आणि घर सोडून पलायन केले.

पबजी गेमला बैटलग्राउंड असेही म्हटले जाते. हा एक ऑनलाईन आणि मोबाईलद्वारा खेळला जाणारा लोकप्रिय खेळ आहे. या गेमची सुरुवात 100 पेक्षा अधिक खेळाडूंपासून होऊ शकते. यात किडनॅप करुन एक रशीयन आयरलँडमध्ये सर्वाईव्ह करायचे असते. प्लेयर पॅराशूटच्या मदतीने प्लेनमधून जम्म करतात. आपल्या आपल्या सर्वाईव्हलसाठी या गेममध्ये प्लेयर्सला 99 प्लेयर्सला पराभूत करायचे असते. हा एक असा गेम आहे जो सर्वजण जिंकू पाहतात. त्यासाठी या गेममध्ये प्लेयर्सच्या घरात जाऊन चोरी (गेममध्ये. प्रत्यक्षात नव्हे) करायची असते. ही चोरी यशस्वी करणाऱ्या प्लेयर्सला खूप सारी शस्त्रे मिळतातत. जी गेम जिंकण्यास फायदा होतो.