Surya Grahan December 2020 Live Streaming: या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आज दिसणार, कुठे, कधी आणि कसे पाहाल? जाणून घ्या
सूर्य ग्रहण 2020 (Photo Credits: Pixabay)

Solar Eclipse 2020: कोरोना काळात बरेचसे लोक हे घरातच असल्यामुळे ग्रहणकाळात फारसा फरक जाणवला आहे. मात्र आज 2020 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिसणार आहे. मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणकाळ पाळायची गरज नाही. हे ग्रहण कदाचित अमेरिकेत (USA) दिसेल. या ग्रहणकाळात चंद्र सूर्याला संपूर्ण व्यापून टाकणार आहे. NASA या सूर्यग्रहणाचे लाईव्ह प्रेक्षपण करणार आहे. हे भारतात दिसले नसले तरीही अन्य देशांमध्ये दिसणार आहे. वर्षाचे हे शेवटचे सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी नागरिकही विशेष तयारीत आहेत. तसेच सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हे ग्रहण पाहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी.

भारतीय वेळेनुसार हे ग्रहण संध्याकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी सुरू होईल तर रात्री 12 वाजता संपणार आहे. साधारण 5 तासांचं हे ग्रहण असणार आहे. संपूर्ण सूर्यग्रहण दक्षिण अमेरिकेत चिली आणि अर्जेंटिनाच्या काही भागांतून सर्वोत्तम दिसेल. चंद्रामुळे सूर्य झाकोळला जातो म्हणून चिली आणि अर्जेंटिनामध्ये काळोख होणार आहे.

त्याचबरोबर अमेरिकेच्या दक्षिण भाग, नैऋत्य आफ्रिका आणि अंटार्क्टिका येथे काही अंशी सूर्यग्रहण दिसणार आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा लोकांना हे ग्रहण पाहण्यासाठी त्यांची लिंक देखील देणार आहे.हेदेखील वाचा- Solar Eclipse 2020: भारतात सुर्यग्रहणाला सुरुवात, पहा दिल्ली, जम्मू कश्मीरसह 'या' महत्वाच्या ठिकाणचे फोटो

येथे पाहा सूर्यग्रहणाचे लाईव्ह प्रक्षेपण

नासाच्या या निर्णयामुळे भारतीयांना देखील हे सूर्यग्रहण पाहता येईल. त्यामुळे जगभरातील अनेक लोकांना या वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचा आनंद घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने घेता येईल.

ग्रहणकाळात सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहिले तर डोळ्यांचा विकार होण्याची शक्यता असते. त्यासाठी विशेष चष्मे वापरा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.