सूर्यग्रहण (Surya Grahan) ही अवकाशातील अगदी सामान्य घटना आहे. भारतामध्ये ग्रहणाविषयी समज-गैर समज असले तरीही एकूण जगात खगोल प्रेमींनी ग्रहणाविषयी मोठी उत्सुकता असते. आज 20 एप्रिल दिवशी 2023 वर्षातलं पहिलं ग्रहण आहे. आजच्या सूर्यग्रहणाचं खास वैशिष्ट्यं म्हणजे हे ग्रहण हायब्रिड (Hybrid Solar Eclipse) आहे. त्यामुळे ते पाहण्याचा योग क्वचितचं मिळतो. तज्ञांंच्या मते असं सूर्यग्रहण 100 वर्षांमध्ये एकदा पहायला मिळतं. मग असा दुर्मिळ योग आज आहे त्यामुळे या हायब्रिड सूर्यग्रहणात नेमकं काय बघायला मिळणार हा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर जाणून घ्या आजचं हायब्रिड सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय आहे?
हायब्रिड सूर्यग्रहण म्हणजे काय?
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण संबोधलं जातं. जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे झाकला जातो, तेव्हा दिसणारं सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण असतं. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या पाठीमागे जातो, तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण असतं आणि जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण असतं. आजच्या हायब्रिड सूर्यग्रहणामध्ये या तिन्ही स्थिती एकाच सूर्यग्रहणामध्ये पाहता येणार आहेत. त्यामुळे खगोलप्रेमींना आजच्या सूर्यग्रहणाचं विशेष आकर्षण आहे.
खग्रास,खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहणाचे तिन्ही प्रकार एकाच सूर्यग्रहणात पृथ्वीवरुन उद्या २० एप्रिल रोजी पाहता येणार आहेत.या ग्रहणाबाबत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ मुकुंद मराठे यांनी दूरदर्शनला अधिक माहिती दिली.
#HybridSolarEclipse@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/SjIoSYrfik
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 19, 2023
दरम्यान भारतामध्ये सूर्यग्रहणच दिसणार नसल्याने या ग्रहणाच्या विविध स्थिती तुम्ही थेट डोळ्यांनी पाहू शकणार नाहीत पण ऑनलाईन माध्यमातून हे ग्रहण पाहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे थेट नाही तर ऑनलाईन हे ग्रहण पहा. Surya Grahan April 2023 Live Streaming: आज दिसणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण, पहा थेट प्रक्षेपण .
भारतीय वेळेनुसार पावणे आठ पासून दुपारी 12.30 पर्यंत ग्रहणाच्या या विविध स्थिती पाहता येणार आहे.