आज (19/2/2019) रात्री भारतातून सुपरमून (Supermoon) पाहायला मिळणार आहे. 21 जानेवारीला देखील सुपरमून दिसला होता. मात्र भारतातून तो दिसणार नसल्याने आज भारतीयांना सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. चंद्राचं सौंदर्य पाहण्याची संधी आज अजिबात सोडू नका. कारण पुन्हा सुपरमून बघण्यासाठी 7 वर्ष वाट पाहावी लागेल. नासा (NASA) ने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल. त्यामुळे आजच्या रात्री चंद्र नेहमीपेक्षा 14% मोठा आणि 30% अधिक चमकदार दिसेल. चंद्र-पृथ्वीची ही स्थिती पुन्हा 2026 मध्ये पाहायला मिळेल. आज रात्री 9 वाजून 23 मिनिटांनी जगभरातून या सूपरमूनचे दर्शन घडेल. (19 फेब्रुवारी रोजी असणाऱ्या माघ पौर्णिमेच्या व्रताच्या कथेचे महत्व जाणून घ्या)
आजच्या सुपरमूनचे वैशिष्ट्य म्हणजे आज चंद्र मागील तीन सूपरमूनच्या तुलनेत अधिक मोठा दिसेल. या सुपरमूनला 'ऐस्ट्रोनॉट्स' असे नाव देण्यात आले आहे.
देशाच्या विविध भागात कधी घडेल सुपरमूनचे दर्शन:
दिल्ली- 6.30
मुंबई- 5.20
कोलकत्ता- सुर्यास्तानंतर अर्ध्या तासाने.
आकाशातील या सर्वात मोठ्या आणि चमकदार चंद्राचे दर्शन घेण्यासाठी सामान्यांप्रमाणेच वैज्ञानिक, खगोलप्रेमीही उत्सुक आहेत.