
सुनिता विल्यम्स (Sunita Williams) चं पृथ्वीवर परतणं आता दृष्टिक्षेपात आलं आहे. सुनिता लवकरच परतणार आहे. क्रु 10 टीम इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये पोहचली आहे. सुनिता आणि बूच लवकरच पृथ्वीवर परत येणार आहेत. सुनिता आणि बूच यांना परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्स मिशन ला क्रु-10 नाव देण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 4 अंतराळवीरांचा समावेश आहे. आज मिशन क्रू-10 टीमचे सदस्य आईएसएस मध्ये पोहचले आहेत. यामध्ये NASA च्याAnne McClain आणि Nichole Ayers, Japan च्या JAXA astronaut Takuya Onishi, आणि रशिया च्या Roscosmos च्या Kirill Peskov यांचा समावेश आहे.
नासाकडून खास व्हिडिओ शेअर
All the hugs. 🫶
The hatch of the SpaceX Dragon spacecraft opened March 16 at 1:35 a.m. ET and the members of Crew-10 entered the @Space_Station with the rest of their excited Expedition 72 crew. pic.twitter.com/mnUddqPqfr
— NASA's Johnson Space Center (@NASA_Johnson) March 16, 2025
नासाचं हे मिशन योग्यप्रकारे पार पडलं तर 9 महिने अंतराळात अडकलेले सुनिता आणि बूच पृथ्वीवर परत येणार आहेत. जून 2024 मध्ये ते केवळ 8 दिवसांसाठी अंतराळात गेले होते. मात्र आता त्यांचा परतीचा प्रवास 287 दिवसांनंतर होणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार हे अंतराळवीर 3-4 दिवसांत पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांनी 5 जून 2024 ला बोईंग च्या स्टारलायनर अंतरिक्ष यान मधून अवकाशात झेप घेतली होती.
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर परतणार
नासा-स्पेसएक्स कडून सुनिता विलियम्स आणि बूच विल्मोर यांच्या वापसीसाठी शुक्रवारी क्रु-10 मिशन लॉन्च करण्यात आले होते. या मिशनला फाल्कन 9 रॉकेट द्वारा लॉन्च करण्यात आले आहे. यापूर्वी या मिशनला बुधवारी लॉन्च करण्यात येणार होते मात्र सिस्टम मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आले. शुक्रवारी हे यशस्वीपणे लॉन्च करण्यात आले. सुनिता आणि बूच यांच्या आता पृथ्वीवर परतण्याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
कधीपासून अडकलेत सुनिता आणि बूच?
बोईंगच्या स्टारलायनर अंतराळ यानामधून 5 जून 2024 दिवशी सुनिता आणि बूच 8 दिवसांसाठी अंतराळात झेपावले होते. जेव्हा ते परतणार होते तेव्हा स्टारलायनरच्या थ्रस्टर मध्ये बिघाड झाला. तेव्हापासून दोघेही अडकले आहेत. मागील 9 महिन्यांपासून त्यांच्या परतीच्या प्रवासाकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान इतका मोठा काळ अंतराळात राहणारी ती पहिली महिला ठरली आहे. नासा आणि स्पेसएक्स यांचे संयुक्त स्वरूपातील हे पहिलंच मिशन आहे.