NASA च्या मदतीने तुमचेही नाव पाठवा मंगळावर; बोर्डिंग पास मिळवण्यासाठी या संकेतस्थळाला भेट द्या
NASA (Photo credits: PTI)

अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) लोकांना त्यांची नावे मंगळावर पाठवण्याची संधी देत आहे. गुरुवारी सकाळी एजन्सीने एक ट्विट करत ही माहिती दिली. त्यात म्हटले आहे की, इच्छुक लोक मार्स रोव्हर 2020 (Mars 2020 Rover) अभियानाअंतर्गत आपली नावे मंगळावर पाठवू शकतात. यासाठी नासा ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांना प्रतीकात्मक बोर्डिंग पास देईल. अशाप्रकारे मायक्रोचिपमध्ये, पृथ्वीवरील कोट्यावधी लोकांचे नाव मंगळावर पाठविले जातील. ज्या लोकांना मंगळावर नाव पाठवायचे आहे ते 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणीद्वारे त्यांचे बोर्डिंग पास मिळवू शकतात.

वॉशिंग्टन डीसीस्थित नासाच्या विज्ञान मिशन संचालनालयाचे सहयोगी प्रशासक थॉमस जुरबुचेन यांनी स्थानिक माध्यमांना या संदर्भात सांगितले की, आम्ही या ऐतिहासिक मार्स मोहिमेस सुरू करण्यास तयार आहोत. शोधाचा हा प्रवास आपल्या सर्वांसह सामायिक करायचा आहे, यासाठी लोकांचे नवे मंगळावर पाठवली जातील. चंद्रापासून मंगळापर्यंत नासाचा प्रवास पसरवण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. (हेही वाचा: चंद्रावर झेपावलेल्या विक्रम लॅन्डरचा शोध घेण्यास NASA असमर्थ, वैज्ञानिक ऑक्टोंबर महिन्यात पुन्हा प्रयत्न करणार)

मार्स रोव्हर मिशन 2020 अंतर्गत नासा आपला 1000 किलो रोव्हर मंगळावर पाठवेल. हा रोव्हर मंगळावर पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या सूक्ष्म जीवनाची माहिती गोळा करेल. रोव्हर मंगळाच्या हवामान आणि भौगोलिक वैशिष्ट्यांचे मूल्यांकन करेल. पृथ्वीवर परत येण्यापूर्वी हे तेथील काही नमुनेही आणेल. या मोहिमेमध्ये एका मायक्रोचीपद्वारे लोकांची नवे मंगळावर पाठवली जातील. यासाठी https://mars.nasa.gov/participate/send-your-name/mars2020 या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.