Super Blood Wolf Moon 2019: भारतामध्ये आज चंद्र ग्रहण दिसणार नाही पण सुपरमून कसा, कधी आणि कुठे पहाल?
Super Blood Wolf Moon 2019 (Photo credits: Pixabay)

Super Blood Wolf Moon 2019 Date and Time:  आज पौष पौर्णिमा चंद्रग्रहण (Chandra Grahan 2019), सुपरमून (Supermoon)  आणि वूल्फमून (Wolfmoon) अशा तीन गोष्टींमुळे विशेष आहे. नववर्षामधील पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2019)  आज होणार आहे. भारतीयांना चंद्रग्रहण दिसणार नसले तरीही आज सुपरमून आणि वुल्फमून पाहण्याची संधी मिळणार आहे. पण नेमक्या या खगोलीय घटना का घडतात याबाबत तुमच्या मनात उत्सुकता असेल तर आज सुपरमून आणि वुल्फमून पाहण्यासोबतच जाणून घ्या त्या दिसण्यामागील शास्त्रीय कारणं काय आहेत? Chandra Grahan 2019 : नववर्षातलं आज पहिलं खग्रास चंद्रग्रहण! भारतामध्ये 'इथे' पहायला मिळणार आजचं चंद्रग्रहण LIVE

सुपरमून (Supermoon 2019)

आज पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने चंद्रबिंब आकाराने 14 टक्के मोठे व 30 टक्के जास्त प्रकाशित दिसेल. या चंद्राला ‘ सूपरमून ‘ म्हणतात. यावेळी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष, 57 हजार 342 किमी. अंतरावर येणार आहे. नववर्षातील पहिल्या पौर्णिमेच्या चंद्राला

‘ वुल्फमून ‘ असे म्हणतात.  Chandra Grahan 2019: 21 जानेवारीला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, जाणून घ्या वेळ आणि खास गोष्टी

कोणत्या वेळेत पहाल 'सुपरमून'?

21 जानेवारी म्हणजे आज रोजी पौष पौर्णिमेला चंद्र सायंकाळी 6.39 वाजता पूर्वेला उगवेल आणि रात्रभर आकाशात दर्शन देऊन दुसर्या दिवशी सकाळी 8.12 वाजता मावळेल. त्यारात्री आपणास ‘ सुपरमून ‘म्हणजे मोठे व जास्त तेजस्वी चंद्रबिंब साध्या डोळ्यांनी पाहता येईल.

'ब्लडमून' (Super blood wolf moon) म्हणजे काय?

सूर्य, पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एकारेषेत येतो तेव्हा अवकाशात चंद्रग्रहण होते. पूर्णचंद्र अशावेळेस लाल रंगाचा दिसतो कारण पृथ्वीची चंद्रावर सावली पडते. यामुळे आपल्याला दिसणारा चंद्र लाल रंगाचा दिसतो. तसेच इतर दिवसांच्या तुलनेत तो जवळ असल्याने अधिक मोठा दिसतो.

सूर्यग्रहणाच्या तुलनेत चंद्रग्रहण सौम्य असते. चंद्राचा प्रकाशकिरण कोमल असल्याने आपण आकाशात थेट साध्या डोळ्यांनीदेखील चंद्रग्रहण पाहू शकतो. आज संध्याकाळी दिसणारा लाल आणि सूपरमूनदेखील आपण थेट पाहू शकतो.