Happy Earth Day 2019: पृथ्वी दिनानिमित्त अनिमेडेट डुडल साकारात गुगलचं अनोखं सेलिब्रेशन!
Happy Earth Day 2019! (Photo Credits: Google Doodles)

Earth Day 2019 Google Doodle: आज 22 एप्रिल म्हणजे अर्थ डे (Earth Day). आज जगभरात अर्थ डे म्हणजेच पृथ्वी दिवस साजरा केला जातो. आपल्या जगण्यात पृथ्वीचे आणि निसर्गाचे असलेले महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे आपल्या निसर्गाचे संतुलन राखण्याची आणि पर्यायाने पृथ्वीचे रक्षण करण्याची सामुदायिक जबाबदारी आपल्यावर आहे. पहिला पृथ्वी दिन हा 22 एप्रिल 1970 साली साजरा करण्यात आला. आज या खास दिवसानिमित्त गुगलने ही खास अनिमेटेड डुडल साकारले आहे.

या अनिमेटेड डुडलमध्ये पृथ्वीवरील विविध जीव दाखवण्यात आले आहेत. विविध जीव, प्राणीमात्रांचे घर असणाऱ्या या पृथ्वी दिनानिमित्त डुडलमध्ये जगातील सर्वात उंच झाड ते सर्वात लहान बेडूक आणि बरंच काही पाहायला मिळतं. अर्थ डे सेलिब्रेशनचा अगदी जबरदस्त मार्ग गुगलने डुडलच्या माध्यमातून दाखवून दिला आहे.

नासा व्हिडिओ:

मग या पृथ्वी दिनामनिमित्त आपण सर्वांनी पृथ्वीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करुया.