हान्स ख्रिश्चन ग्रॅम यांचा 166 वा स्मृतिदिन: Hans Christian Gram या मायक्रोलॉजिस्टच्या 'Gram Stain' ला सलामी देणारे खास  Google Doodle
Hans Christian Gram Google Doodle (Photo Credits: Google Home Page)

Hans Christian Gram Google Doodle: गूगल या सर्च इंजिनकडून आज (13 सप्टेंबर) दिवशी डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट हान्स ख्रिश्चन ग्रॅम (Hans Christian Gram) यांच्या 166 वा स्मृतिदिनी खास गूगल डुडलच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील 'Gram stain'या बॅक्टेरिया स्टेनिंग प्रक्रियेचा शोध लावणार्‍या या मायक्रोबायोलिस्टच्या कार्याला आज अनोख्या अंदाजात सलाम करण्यात आला आहे. 1884 साली हान्स ख्रिश्चन ग्रॅम यांनी बॅक्टेरियांचे मायक्रोस्कोप खाली अधिक अचूक निदान आणि वर्गीकरण करण्यासाठी हान्स ख्रिश्चन ग्रॅम यांनी 'Gram stain'पद्धती आणली. आज त्यांच्या निधनाच्या 8 दशकांनंतरही प्रभावीपणे वापर केला जातो.

मायक्रोबायोलॉजी विषयामध्ये Gram stain पद्धती ही क्रांतीकारी ठरली. या पद्धतीमध्ये बॅक्टेरियांचे Gram-negative आणि Gram-positive असे वर्गीकरण करता येते. याकरिता जांभळ्या रंगाच्या डायचा वापर केला हातो. त्यानंतर त्याला आयोडिन सोल्युशन आणि ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये भिजवलं जातं. यानंतर बॅक्टेरिया जर थिक सेल वॉलचा असेल तर तो जांभळ्या रंगामध्ये दिसतो त्याला Gram-positive असे संबोधले जाते. आणि जर पातळ सेल वॉलचा बॅक्टेरिया असल्यास त्यावर रंग राहत नाही त्याला Gram-negative असं संबोधलं जातं. हान्स ख्रिश्चन ग्रॅम यांच्या या प्रकियेचा विचार करता आज गूगल डूडल बनवलं आहे.

हान्स ख्रिश्चन ग्रॅम यांचा जन्म 13 सप्टेंबर 1853 साली डॅनिश राजधानी कोपनहेगन येथे झाला. ग्रॅम यांनी त्यांच्या वैद्यकीय करियरची सुरूवात स्थानिक रूग्णालयात फिजिशियन म्हणून केला. 1938 साली वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाके. आजही वैद्यकीय क्षेत्रात, निदान प्रणालीमध्ये त्यांच्या योगदानाचे मूल्य जपले जाते. मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांच्या योगदानाने भरीव कामगिरी केली आहे.