Conspiracy theorist claimed to have spotted a fleet of 10 UFOs near InternationalSpace Station (Photo Credits: YouTube/Screengrab)

परग्रहवासी (Aliens) हे नेहमीच आपल्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरले आहेत. याआधी एलियन्सबाबत अनेक दावे केले आहेत मात्र अजूनतरी उडत्या तबकड्या आणि त्यातील न माहित असणाऱ्या लोकांविषयी कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. आता परग्रहासंबंधी आणखी एक दावा समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (International Space Station) अगदी खाली दहा छोट्या काळ्या गोष्टी उडत असताना टिपल्या गेल्या आहेत. यांना अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (UFO) म्हटले जात आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या लाइव्ह फीड दरम्यान, दक्षिण अटलांटिक महासागराच्या वर्तुळात हे 10 यूएफओ दिसले आहेत.

‘द सन’ च्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून नासाच्या लाइव्ह स्ट्रीम दरम्यान घेतलेल्या छायाचित्रात ऑर्ब-सारखे ऑब्जेक्ट्स (Orb-Like Objects) दिसत आहेत. यूएफओ हंटर 'Mr MBB333' ने 3 जुलै रोजी स्पेस वॉचरचे घेतलेले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये दिसत आहे की काही लहान वस्तू फिरत आहेत, या वस्तूंना यूएफओ म्हटले जात आहे. मात्र नासाने अजूनतरी याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. सध्या हे फुटेज मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

पोस्टमध्ये, यूएफओ हंटरने म्हटले आहे की पृथ्वीच्या वर असलेल्या अवकाश स्थानकाजवळ कमीतकमी 10 अज्ञात वस्तू पाहिल्या गेल्या आहेत, जे यूएफओ  असू शकतात. यूएफओ हंटरच्या या दाव्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर एलियनच्या अस्तित्वाविषयी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, नुकतेच अमेरिकेमध्ये एलियन्स आणि यूएफओ संदर्भात एक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात सरकारने म्हटले आहे की, नौदल वैमानिकांनी पाहिलेल्या रहस्यमय उड्डाण करणाऱ्या वस्तूंचे स्वरूप निश्चित करण्यासाठी संरक्षण व गुप्तहेर विश्लेषकांकडे पुरेसा डेटा उपलब्ध नाही. मात्र, सरकारने युएफओचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला नाही. अमेरिकन सरकारने प्रथमच कबूल केले की या विषयावरील सविस्तर तपासणीची आवश्यकता आहे. अमेरिकेत आतापर्यंत यूएफओ पाहण्याच्या 144 घटना नोंदवल्या गेल्या आहेत.