Earth Receives First Laser-Beamed Message:नासा ने दिली मोठी अपडेट! अवकाशात 16 मिलियन अंतरावरून Optical Communications यशस्वी
Earth | (Representational Image; Photo Credit: Pixabay)

पृथ्वीने चक्क 16 मिलियन किलोमीटर दूर अंतरावरून laser-beam communication यशस्वीरित्या स्वीकारलं आहे. नासा च्या माहितीनुसार अशाप्र्कारे पहिल्यांदा सर्वात दूर अंतरावरील optical communications, त्यांनी स्वीकारले आहे. हे अंतर चंद्र आणि पृथ्वी मधील अंतराच्या देखील 40 पट आहे. Deep Space Optical Communications च्या यंत्राद्वारा NASA's Psyche mission चा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. फ्लोरिडाच्या Kennedy Space Centre वरून ते 13 ऑक्टोबरला लॉन्च झाले होते.

Psyche spacecraft आणि कॅलिफोर्नियाच्या Palomar Observatory च्या Hale Telescope मध्ये 14 नोव्हेंबरला संभाषण नोंदवण्यात आलं आहे. टेस्ट मध्ये DSOC मधील जवळच्या इन्फ्रारेड फोटॉन्सना पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 50 सेकंद लागले.

'first light' हा पहिला कम्युनिकेशन लिंक आहे. NASA Headquarters मध्ये director of Technology Demonstrations वरील Trudy Kortes, यांच्यामते "first light साध्य करणे हे येत्या काही महिन्यांतील अनेक क्रिटिकल DSOC मधील मैलाचे दगड आहे, जे higher-data-rate communications कडे मार्ग मोकळा आहे जे वैज्ञानिक माहिती, high-definition imagery आणि support of humanity's next giant leap च्या समर्थनार्थ व्हिडिओ स्ट्रिम करण्यास सक्षम आहे."

Psyche spacecraft चे प्राथमिक उद्दिष्ट आहे की metallic asteroid Psyche बाबत अधिक माहिती मिळवणं. त्याचा फायदा आपल्याला ग्रह कसा बनला आणि त्याच्या बदलांबाबत माहिती देण्यासाठी होणार आहे. दोन वर्षांच्या प्रयोगात लेझर सिग्नल त्याच्या लक्ष्याकडे जाताना वाढत्या दूरच्या ठिकाणांहून पाठवले आणि प्राप्त केले जातील. 2029 मध्ये लघुग्रहावर आल्यानंतर हे यान कक्षेत प्रवेश करणार आहे.

NASA Jet Propulsion Laboratory project technologist Abi Biswas यांच्या माहितीनुसार,First light हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. ग्राउंड टेक्नॉलॉजीने सायकीवर DSOC च्या फ्लाइट ट्रान्सीव्हरमधून डीप स्पेस लेसर बीम यशस्वीरित्या शोधले. आम्ही डेटा देखील प्रसारित करू शकतो, याचा अर्थ आम्ही खोल जागेसह 'बिट्स ऑफ लाईट' ट्रेड करू शकतो, ते पुढे म्हणाले.