Asteroid 4660 Nereus: येत्या आठवड्यात पृथ्वीच्या  2.5 मिलियन माईल्स जवळून जाणार लघुग्रह
Representational Image Asteroid (Photo Credits: Pixabay)

सामान्य आकारापेक्षा मोठा असा asteroid येत्या आठवड्यात पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. या asteroid चं नाव 4660 Nereus आहे. ही घटना 11 डिसेंबर दिवशी होणार आहे. या घटनेबद्दल चर्चा होत असली तरीही 4660 Nereus हा सुरक्षित अंतरावरून जाणार आहे. रिपोर्ट्स नुसार पृथ्वीपासून त्याचं अंतर 3.93 मिलियन किलिमीटर आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्राच्या अंतरामधील 10 पटीने हे अंतर आहे.

4660 Nereus चा आकार आणि पृथ्वीपासूनचं अंतर यामुळे ही धोकादायक घटना समजली जात आहे. सामान्यपए जो asteroid हा 7.48 मिलियन किमीच्या अंतरामध्ये आणि 140 मीटर (500 फीट) यापेक्षा मोठा असतो त्याचं वर्गीकरण 'धोकादायक' म्हणून केले जाते. World Asteroid Day 2021: कधी साजरा केला जातो लघुग्रह दिवस? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास .

4660 Nereus हा पहिल्यांदा 1982 साली शोधण्यात आला होता. हा धोकादायक आहे म्हणून स्पेशल नव्हे तर पृथ्वीजवळून रिलेटीव्ह फ्रिक्वेंसी ने जात असल्याने चर्चेमध्ये आहे. त्याचे 1.82 वर्ष जुनी ऑर्बिट आपल्या जवळ येत आहे. दर 10 वर्षांनी तो अधिक जवळ येत आहे. पण अवकाशीय घटनेचा विचार करता हे जवळ येणं अजूनही सुरक्षित अंतरावरच आहे.

दरम्यान asteroid मुळे सध्या काही धोका नसला तरीही काळजी घेणं आवश्यक आहे. मागील काही काळात asteroid मुळे पृथ्वीवर परिणाम झाल्याचं पहायला मिळालं आहे. स्पेस एजंसी सध्या यावर काम करत आहेत. नासा स्पेसक्राफ्ट कडून त्यासाठी मिशन लॉन्च करण्यात आलं होतं त्याला Double Asteroid Redirection Test किंवा DART असं नाव आहे. त्याद्वारा लघुग्रह रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात याची शक्यता आहे.