सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कमी किंमतीसह आपल्या टॅगसह पुढील महिन्यात आपला लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold, Galaxy XZ Flip 3 ची लॉन्चिंग करणार असल्याचे घोषित केले आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, Samsung 11 ऑगस्ट महिन्यात अन्य एक्ससरिजसह हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले जातील. गॅलेक्सी झेड फोल्ड 3 एस पेन-प्रो सपोर्टसह येऊ शकतो. झेड फोल्ड3 साठी सुद्धा एस पेन प्रोचा सपोर्ट दिला जाणार आहे.(World Emoji Day 2021: Facebook सादर करत आहे Soundmojis; आता पाठवू शकाल साऊंड इफेक्टसह इमोजी)
दक्षिण कोरियाची टेक दिग्गज कंपनी Galaxy Z Fold3 ची किंमत जवळजवळ 1.99 मिलीयन वोन ($1744) सुरु होण्याची शक्यता आहे. जी गेल्या मॉडेलसाठी 2.39 मिलियन वोन सेटच्या तुलनेत 17 टक्क्यांनी कमी आहे. नुकत्याच एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, Galaxy Z Fold 3 मध्ये एक अंडर डिस्प्ले कॅमेरा असू शकतो. तर क्लॅमशेल फोल्डेबल गॅलेक्सी झेड फ्लिप 3 मध्ये मोठा आउटर डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी झेड फ्लिप 3 मध्ये 1.83 इंचाचा एक मोठा एक्सटर्नल डिस्प्ले मिळू शकतो. यामध्ये एक डुअल कॅमेरा सिस्टम असून जी कथित रुपात 12 मेगापिक्सलचा मुख्य स्नॅपर आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड स्निपरचा समावेश आहे.
दरम्यान, सॅमसंग कंपनीने गेल्या वर्षात Samsung Galaxy Z Fold 2 लॉन्च केला होता. या स्मार्टफोनमची किंमत 1,49,999 रुपये आहे. फिचर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 7.6 इंचाचा फुल HD+ फोल्डेबल डायनॅमिक एमोलेड इनफिन्टिव O डिस्प्ले दिला आहे. त्याचसोबत फोनमध्ये दुसरा 6.2 इंचाची एमोलेड स्क्रिन दिली आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 865+ प्रोसेसर आणि 12GB रॅमचा सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन अॅन्ड्रॉइड10 बेस्ड One UI 2.5 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणार आहे.