Samsung Smart Things Find App: सॅमसंग ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. कारण, आता तुम्ही तुमचा हरवलेला सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन, गॅलेक्सी वॉच, टॅब्लेट किंवा इअरबड्स शोधण्यात सक्षम असणार आहात. कंपनीने यासाठी SmartThings Find नावाचे अॅप लाँच केले आहे. विशेष म्हणजे हे अॅप इंटरनेट कनेक्शनशिवाय आणि नेटवर्कविना गमावलेला सॅमसंग गॅलेक्सी डिव्हाइस शोधण्यात मदत करते. नेमकी हे अॅप कसं काम करत यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. सॅमसंगने शेअर केलेल्या तपशीलांनुसार, स्मार्टथिंग्ज अॅप ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) आणि अल्ट्रा-वाइडबँड तंत्रज्ञान वापरुन गमावलेल्या गॅलेक्सी डिव्हाइसचा शोध घेते. डिव्हाइस शोधल्यानंतर, हे अॅप वापरकर्त्यास नकाशा आणि ध्वनीद्वारे मोबाईलपर्यंत पोहोचवते.
दरम्यान, सॅमसंगचे हे अॅप अँड्रॉइड 8 आणि ओएसवर कार्यरत गॅलेक्सी स्मार्टफोन आणि टॅबलेटवर कार्य करू शकते. हे गॅलेक्सी वॉचेजसह सुसंगत आहे. जे Tizen 5.5 किंवा त्यानंतरच्या ओएसवर कार्य करते. गॅलेक्सी बड्स प्लस आणि गॅलेक्सी बड्स लाईव्हला या फिचर्ससाठी ओएस अपडेट प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. (हेही वाचा - Poco चा नवा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये होणार लाँच; कंपनीने सोशल मीडियावर दिली माहिती)
सॅमसंग कंपनीने सांगितले आहे की, डिव्हाइस 30 मिनिटांसाठी ऑफलाइन झाल्यानंतर, त्यातून बीएलई सिग्नल येतात. जे इतर डिव्हाइस प्राप्त करू शकतात. यानंतर आपण हरवलेल्या डिव्हाइसचा शोध घेण्यासाठी स्मार्टथिंग्स अॅपला सिग्नलला मॅच करू शकतो. ही सेवा वापरणारे कोणतेही नजीकचे गॅलेक्सी डिव्हाइस सॅमसंग सर्व्हरला त्या स्थानाची माहिती देते. (वाचा - Flipkart Big Diwali सेल मध्ये खरेदी करा 8 हजारांहून कमी किंमतीतील 'हे' दमदार स्मार्टफोन)
त्यानंतर सॅमसंग त्या यूजर्सपर्यंत पोहोचते. डिव्हाइसच्या जवळ पोहोचल्यानंतर आपण आपल्या इच्छेनुसार त्याची रिंग वाजवू शकता किंवा AR आधारित शोधाद्वारे मोबाईल शोधू शकता. एन्क्रिप्शनमुळे वापरकर्त्याचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो या अॅपचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या फिचर्सचा सॅमसंग ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे.