Samsung Neo QLED TV भारतात लाँच, घरबसल्या मिळेल थिएटरचा अनुभव, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये
Samsung Neo QLED TV (Photo Credits: Samsung/Twitter)

सॅमसंगने (Samsung) आपला नवा टीव्ही भारतात लाँच केला आहे. Samsung Neo QLED TV लाइन-अप भारतात लाँच केला आहे. साउथ कोरियन कंपनीचा हा टिव्ही आहे. या टीव्हीचा डिस्प्ले खूपच जबरदस्त आहे. यात Quantum Mini-LED लाइट सोर्स आणि Neo Quantum प्रोसेसरसुद्धा मिळत आहे. कंपनीने हा टीव्ही 5 वेगवेगळ्या स्क्रीनसह लाँच केला आहे. ज्यात 50 इंचापासून 85 इंचापर्यंत पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. हा टीव्ही कंपनीने पहिल्यांदा CES 2021 च्या व्हर्च्यअल इव्हेंटमध्ये सादर केला होता.

Samsung Neo QLED TV ची किंमत 99,990 रुपयांपासून सुरु होते. हा टीव्ही Amazon, Flipkart, Samsung India आणि इलेक्ट्रॉनिक स्टोरवर उपलब्ध होईल. 15 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान प्री बुकिंगमध्ये हा टीव्ही उपलब्ध होईल.हेदेखील वाचा- Reliance Jio च्या 70 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्पेशल रिचार्जवर मिळवा फ्री कॉल आणि 24GB डेटा

या व्हीच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, यात 8K आणि 4K असे दोन व्हर्जन मिळतात. यात Quantum Mini LEDs चा वापर करण्यात आला आहे. यामुळे डिस्प्ले लाइट आणि कॉन्ट्रास्ट लेबल प्रोड्यूस होते. या टीव्हीमध्ये Motion Xcelerator Turbo+ फीचर दिले आहे. ज्यामुळे यूजर्सला PC आणि Console गेम्स सुपर अल्ट्रा वाइड गेम व्हयू आणि एका वेगळ्या गेम बार खेळण्याची फिचर देण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी भारतात Samsung Galaxy F02s स्मार्टफोन लाँच करण्यात आला. या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले मिळेल. या फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. याच्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर दिले आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये 3GB/4GB रॅम आणि 32GB/64GB स्टोरेज पर्याय दिले आहेत.