Samsung Galaxy M02s स्मार्टफोन येत्या 7 जानेवारीला होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक
Samsung (Photo Credit: Fortune)

सॅमसंग कंपनी आपला बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M02s च्या लॉन्चिंग बद्दल घोषणा केली आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन येत्या 7 जानेवारीला दुपारी 1 वाजता लॉन्च केला जाणार आहे. सॅमसंगचा हा नवा स्मार्टफोन शिखाला परवडेल अशा 10 हजार रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला जाणार आहे. Samsung Galaxy M02s स्मार्टफोनचे पेज लाइव्ह सुद्धा करण्यात आले आहे. तत्पूर्वी लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन भारतात ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन व्यतिरिक्त अन्य रिटेल स्टोअर मध्ये सुद्धा खरेदी करता येणार आहे.

कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस इन्फिनिटी V डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो वॉटर ड्रॉप स्टाइल डिस्प्ले सारखा दिसणार आहे. फोन दोन स्टोरेज वेरियंट म्हणजेच 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज तर दुसरा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. प्रोसेसरच्या आधारावर स्मार्टफोनवर Snapdragon 450 चा वापर केला जाऊ शकतो. खासकरुन सॅमसंग कंपनी इन-हाउस Exynos प्रोसेसरचा वापर करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तसेच 5000mAh ची दमदार बॅटरी ही दिली जाणार आहे. परंतु फोनचे चार्जर सी टाइप मध्ये येणार आहे.(Samsung Galaxy S21 सीरिज 'या' दिवशी होणार लाँच, कुठे पाहता येईल हा लाईव्ह इव्हेंट)

तर Samsung Galaxy M02s हा स्मार्टफोन Samsung Galaxy M01s चे अपडेटेड वर्जन असणार आहे. जो 9,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला होता. यामध्ये 6.2 इंचाचा एचडी प्लस इन्फिनिटी डिस्प्ले दिला आहे. अॅन्ड्रॉइड 10 ओएस वर आधारित हा स्मार्टफोन MediaTek Helio P22 वर काम करणार आहे. यामध्ये दिला गेलेला स्टोरेज मायक्रोएसडीच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनमध्ये सिक्युरिटीसाठी रियर माउंटेड फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर ही दिला आहे. यामध्ये 13MP+2MP चा ड्युअल कॅमेरा दिला आहे. तर फोनचा फ्रंट कॅमेरा 8MP चा असणार आहे. पॉवर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी आणि USB Type C सपोर्ट दिला गेला आहे.