Samsung Galaxy M02 स्मार्टफोन 2 फेब्रुवारी रोजी होणार लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
Samsung Galaxy M02 (Photo Credits: Amazon India)

साऊथ कोरियन (South Korean) मोबाईल मेकर कंपनी सॅमसंग (Samsung) ने आपला गॅलेक्सी M02 (Galaxy M02) स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार आहे. लॉन्चपूर्वी हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियावर (Amazon India) लिस्ट करण्यात आला असून त्याची लॉन्च डेट (Launch Date) आणि की स्पेसिफिकेशन्स (Key Specifications) जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, हा स्मार्टफोन 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता लॉन्च होणार आहे. Galaxy M02 या स्मार्टफोनची किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी असेल. (Samsung Galaxy M21s: सॅमसंग गॅलेक्सी एम 21 एस स्मार्टफोन लॉन्च; काय आहेत खासियत? घ्या जाणून)

Galaxy M02 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+Infinity-V डिस्प्ले देण्यात आला असून त्यात 5,000mAh ची बॅटरी 7.5W चार्गिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Galaxy M02s सारखाच असेल. केवळ रॅम आणि कॅमेऱ्यात फरक असेल. Galaxy M02 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट देण्यात आला आहे. (Samsung Smart Things Find App: सॅमसंगचे 'हे' अॅप विना इंटरनेट आणि नेटवर्कशिवाय शोधेल तुमचा हरवलेला मोबाईल फोन)

Samsung Galaxy M02 (Photo Credits: Amazon India)
Samsung Galaxy M02 (Photo Credits: Amazon India)

युरोपमध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी A02s या मॉडलला रिब्रँड करुन हा फोन लॉन्च करण्यात येणार आहे. या मोबाईलमध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल असा ड्युअल रिअर कॅमेरा दिला जावू शकतो. तर समोरील बाजूस 5 मेगापिक्सलचा सेल्फी शूटर दिला जावू शकतो. हा हँडसेट 3GB रॅम+32GB आणि 9GB रॅम+128GB स्टोरेज या दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध असण्याची शक्यता आहे.