सॅमसंग (Samsung) कंपनीचा नवा स्मार्टफोन Samsung Galaxy F02s आज ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) लाँच होणार आहे. आज दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. लाँचपूर्वी हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसह सॅमसंगचा आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy F12 देखील लाँच होणार आहे. #FullOn असे हॅशटॅग वापरत हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर तुम्ही या स्मार्टफोनचे फ्रंट आणि बॅक पॅनल डिझाईन पाहू शकता.
Samsung Galaxy F02s च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले मिळेल. या फोनच्या डिस्प्लेमध्ये वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. याच्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर दिले आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये 3GB/4GB रॅम आणि 32GB/64GB स्टोरेज पर्याय दिले आहेत.हेदेखील वाचा- Samsung Galaxy F12 उद्या भारतात लाँच होणार लाँच, काय असू शकतात याची खास वैशिष्ट्ये
Go #FullOn binging with the new #SamsungF02s, the phone that boasts of a large 16.55cm (6.5”) HD+ Display and a power packed 5000mAh battery. Launching on 5th April, 12 noon. pic.twitter.com/h9JlHfKlXk
— Samsung India (@SamsungIndia) April 1, 2021
या स्मार्टफोनच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, 13MP+5MP+2MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल. त्याशिवाय फोनमध्ये 5MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेंसर असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा असेल.
त्याचबरोबर आज भारतात Samsung Galaxy F12 स्मार्टफोन देखील लाँच होणार आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, यामध्ये 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचबरोबर यात 90Hz रिफ्रेश रेट असलेली PLS IPS स्क्रिन दिली आहे. या स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते.