Samsung Galaxy A72 स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि फिचर्स
Samsung Galaxy (Photo Credits: Twitter)

Samsung Galaxy A72: सॅमसंगचा ए-सीरिजचा आगामी Samsung Galaxy A72 स्मार्टफोन त्याच्या लॉन्चिंगबाबत अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या स्मार्टफोनचे अनेक अहवाल लीक झाले आहेत, ज्यात संभाव्य किंमत आणि लॉन्चिंगची माहिती देण्यात आली आहे. आता हा हँडसेट TUV Rheinland प्रमाणपत्र वेबसाइटवर आढळला आहे. गिज्मो चायनाच्या अहवालानुसार, आगामी Samsung Galaxy A72 स्मार्टफोन SM-A725F/DS, SM-A725F मॉडल क्रमांकाची यादी जपानच्या टीयूव्ही राईनलँड प्रमाणपत्र वेबसाइटवर सूचीबद्ध केली आहे. यादीनुसार, गॅलेक्सी ए 72 स्मार्टफोन 25 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. याशिवाय फारशी माहिती मिळालेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, गॅलेक्सी ए 72 मध्ये यूजर्सला क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल. याशिवाय वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट सारख्या कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात येईल. (वाचा - Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)

Samsung Galaxy A72 ची संभाव्य किंमत -

सॅमसंगचा आगामी फोन Galaxy A72 फेब्रुवारीच्या उत्तरार्धात बाजारात येईल. या स्मार्टफोनची किंमत बजेटमध्ये असेल. कंपनीने गॅलेक्सी ए 72 च्या लॉन्चिंग, किंमत आणि फीचर्सबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. (वाचा - Motorola Capri Plus स्मार्टफोन भारतात लवकरचं लाँच होणार; जाणून घ्या संभाव्य स्पेसिफिकेशन्स आणि किंमत)

Samsung Galaxy A71 -

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये सॅमसंगने भारतात Samsung Galaxy A71 सादर केला होता. या स्मार्टफोनची किंमत 27,499 रुपये आहे. गॅलेक्सी ए 71 मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. त्याचे डिझाइन सॅमसंग गॅलेक्सी ए 51 प्रमाणेचं आहे. पंच-होल कॅमेरा सेट-अप त्याच्या पुढील पॅनेलमध्ये देण्यात आला आहे. तसेच एल-आकाराचे क्वाड कॅमेरा सेट-अप मागील पॅनेलमध्ये देण्यात आला आहे. फोनमध्ये Infinity-O- Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या इतर फिचर्सविषयी बोलताना त्यात Snapdragon 730 (8nm) चिपसेट प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेटअप आहे. या व्यतिरिक्त यात 5 मेगापिक्सलचे डीप्थ सेन्सर, 5 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आणि 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. Super Steady Video, UHD recording, AR Doodle, Crop Zoom यासारखे फीचर्स देखील फोनच्या मागील कॅमेर्‍यामध्ये देण्यात आल्या आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.