Motorola Capri Plus: मोटोरोला दोन नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. लवकरचं Motorola Capri आणि Motorola Capri Plus या नावाने हे स्मार्टफोन बाजारात येऊ शकतात. हे दोन्ही स्मार्टफोन थायलंडच्या एनटीबीसी प्रमाणपत्र साइट आणि यूएस एफसीसी वेबसाइटवर सूचीबद्ध केले गेले आहेत. भारतीय वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Motorola Capri Plus लवकरचं भारतातही दाखल होणार आहे. बीआयएसच्या प्रमाणपत्राद्वारे ही बाब उघडकीस आली आहे.
टिपस्टर मुकुल शर्मा यांनी माहिती दिली आहे की, मोटोरोलाचा आगामी स्मार्टफोन Motorola Capri Plus भारताच्या प्रमाणपत्र साइट बीआयएस वर मॉडेल नंबर Motorola XT2129-2 म्हणून सूचीबद्ध आहे. यावरून हा स्मार्टफोन लवकरचं भारतात लॉन्च होईल असा अंदाज आहे. तथापी, कंपनीने या स्मार्टफोनची लाँचिंग तारीख किंवा वैशिष्ट्य अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. हा स्मार्टफोन Moto G30 म्हणून देखील लाँच केला जाऊ शकतो. (वाचा - Samsung Galaxy A52 5G स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)
Motorola Capri Plus संभाव्य वैशिष्ट्ये -
Motorola Capri Plus बाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी जीबी रॅम आणि 128 जीबी अंतर्गत स्टोरेज दिले जाऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना 4,000 एमएएच बॅटरी मिळेल, जी 20 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. या स्मार्टफोनला एचडी + स्क्रीन दिली जाऊ शकते, जी 90 हर्ट्जच्या रीफ्रेश रेटला सपोर्ट देईल. (वाचा - Oppo Reno 5 Pro 5G स्मार्टफोनचा भारतात आज पहिला सेल; जाणून घ्या किंमत आणि खास ऑफर्स)
Motorola Capri Plus ला वॉटरड्रॉप स्टाईल नॉच आणि 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा मिळेल. याशिवाय स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 64 एमपी प्राइमरी सेन्सर असेल. फोनमध्ये 13 एमपी अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 एमपी खोलीचे सेन्सर आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स आहेत. कंपनी हा स्मार्टफोन 12,000 रुपयांच्या किंमतीसह भारतात लॉन्च करू शकते.