Samsung Galaxy A7 : 3 रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन भारतात लॉन्च
सॅमसंग गॅलक्सी ए7 (Photo Credits : Twitter)

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने आज पहिला रिअर कॅमेऱ्याचा स्मार्टफोन गॅलेक्सी ए7 भारतात लॉन्च केला. यात 24 मेगापिक्सलची एएफ लेन्स, एक 8 मेगापिक्सलची 'अल्ट्रा वाईड' लेन्स (एफ2.4) आणि 5 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स देण्यात आली आहे. या स्मार्टफोन 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.

सॅमसंग गॅलक्सी ए7 मध्ये 6 इंचाचा फुल-एचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी डिस्प्ले, डॉल्बी एटमस ऑडियो टेक्नोलॉजी त्याचबरोबर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले आहे. 24 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही आहे.

गॅलक्सी ए7 च्या बॅक कमेऱ्यात 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड लेन्सचे व्यूइंग अॅंगल आहे. या डिव्हाईसमध्ये कमी किंवा अधिक प्रकाश दोन्हीही स्थितीत स्पष्ट फोटो येण्याची क्षमता असते.

हा फोन 2 वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पहिले वेरिएंट 4GB/64GB चे असून त्याची किंमत 23990 रुपये आहे. तर 6GB/128GB वेरिएंटची किंमत 28990 रुपये इतकी आहे.