आश्चर्यम! इथे 5G चा पत्ता नाही आणि Samsung ने सुरु केली 6G ची तयारी; नवीन संशोधन केंद्राची उभारणी
प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकतेच दक्षिण कोरिया, चीन यांसारख्या देशांनी 5 जी (5G) नेटवर्क वापरायला सुरुवात करून, इतरांना सुखद धक्का दिला. आता इतर अनेक देश 5 जी वर काम करत आहेत. भारतात्त लवकरच 5G ट्रायल सुरू होणार आहे. मात्र दक्षिण कोरियन टेक्नॉलॉजी कंपनी सॅमसंग (Samsung) जगभरात 5 जी सेवा पूर्णतः सुरू होण्यापूर्वीच 6 जी (6G) ची तयारी करत आहे. सॅमसंग ने शियोल मध्ये 6G मोबाइल नेटवर्कच्या विकासासाठी नवीन रिसर्च सेंटर उघडले आहे.

कंपनीचा संशोधन आणि विकास फर्म सॅमसंग रिसर्च, अॅडव्हान्स सेल्युलर तंत्रज्ञान विकासावर काम  करत आहे. सॅमसंग रिसर्चने 6 जी नेटवर्कच्या विकासासाठी एक नवीन टीम देखील तयार केली आहे. या वेळी जगभरात 4 G LTE मेनस्ट्रीम कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बनला आहे. कोरियन मीडिया अहवालानुसार, 5 G सेवा केवळ काही देशांमध्येच रोल आउट केली गेली आहे. अशावेळी सॅमसंगचे 6G वर काम करणे, कंपनीचे दूरगामी तंत्रज्ञान आणि व्यवसाय योजनेचा भाग दर्शवतो. सॅमसंगनेच जगातील पहिला 5G स्मार्टफोन Galaxy S10 5G एप्रिल मध्ये सादर केला आहे. (हेही वाचा: भारतात होत आहे 5G नेटवर्कची ट्रायल; या शहरापासून होणार सुरुवात)

जानेवारी मध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंक ने 6G रिसर्च सेंटर उघडण्यासाठी कोरिया एडवांस्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी (KAIST) शी हातमिळवणी केली आहे. आगामी 6 G चा उद्देश इंटरनॅशनल रिसर्च जर्नल ऑफ़ इंजीनियरिंग अँड टेक्नोलॉजी नुसार, उच्च कव्हरेज दर आणि 5 G च्या तुलनेत वेगवान इंटरनेट स्पीड प्रदान करण्यासाठी, जागतिक कव्हरेजसाठी साठी उपग्रहांचे एकत्रीकरण करणे हे आहे.