Riverfront Times Layoffs: यूएसमधील रिव्हरफ्रंट टाईम्स वृत्तपत्रामध्ये कर्माचारी कपात, हस्तांतरणानंतर संपादकीय विभागात गमावलेल्या नोकऱ्यांवर कर्मचाऱ्यांनी सांगितला अनुभव
(Photo Credit: Official Website)

Riverfront Times Layoffs: यूएसमधील रिव्हरफ्रंट टाईम्स (Riverfront Times) वृत्तपत्रामधील कर्मचारी टाळेबंदी(Layoffs)ने प्रभावित झाले आहे. आर्थिक अडचणींमुळे रिव्हरफ्रंट टाईम्स वृत्तपत्राचे मालकी हक्क दुसऱ्या कंपनीला देण्यात आले होते. मात्र, त्या कंपनीने संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल आहे. रिव्हरफ्रंट टाईम्स वृत्त पत्राची 1977 मध्ये स्थापना झाली होती. समोर आलेल्या अहवालात रिव्हरफ्रंट टाईम्सच्या टाळेबंदीमुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा उल्लेख करण्यात आलेला नाही.(हेही वाचा: TikTok Layoffs: टिकटॉक कंपनीमध्ये टाळेबंदीची घोषणा; 1,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी - रिपोर्ट)

Bizjournals च्या अहवालानुसार, Big Lou Media चे CEO ख्रिस कीटिंग, यांनी Riverfront Times विकले, यावर आधारीत प्रश्न विचारले असता, त्यांनी प्रश्नांची उत्तर दिले नाहीत त्याशिवाय, खरेदीदारांची ओळख उघड केली नाही. तथापि, RFT च्या संपादक साराह फेन्स्के यांनी रिव्हरफ्रंट टाइम्सच्या टाळेबंदीमुळे चांगले लेखक, संपादक आणि छायाचित्रकार यांच्यावर परिणाम होत असल्याबद्दल खदखद व्यक्त केली. (हेही वाचा: SeekOut Layoffs: सीकआउट टाळेबंदी, 30% कर्मचाऱ्यांवर नोकर गमावण्याची वेळ)

संपादकीय कर्मचाऱ्यांपैकी प्रभावित कर्मचारी असलेल्या कॅली कॉक्स यांनी त्यांचा अनुभव सांगताना म्हटले की, याचा अत्यंत वाईच परिणाम झाला आहे. तर सारा फेन्स्के म्हणाल्या की, 'आम्ही चांगली लढाई लढली. सर्व पत्रकारांनी अहोरात्र काम केले आहे. मला आशा आहे की त्यांना कुठेतरी चांगले काम नक्की मिळेल, कोणीतरी त्यांना काम देईल'. ती पुढे म्हणाली की ते 'सत्य जगासमोर आणण्याचे 47 व्या वर्षांची रिव्हरफ्रंट टाइम्सची परंपरा पुढे चालू ठेवतील'. ती म्हणाली की बिग लू मीडिया रिव्हरफ्रंट टाइम्स सेल्स टीमच्या दोन सदस्यांसाठी घर शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतू ते शक्य होत नाहीये.

रिव्हरफ्रंट टाईम्सची स्थापना 47 वर्षांपूर्वी 1998 मध्ये रे हार्टमन आणि मार्क विटर्ट यांनी केली होती. बिग जर्नल्सने सांगितल्या प्रमाणे, संस्थापकांनी हे वृत्तपत्र न्यू टाइम्स मीडिया, नंतर व्हॉइस मीडियाला विकले होते. RFT ला अनेक वेळा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. RFT सह वृत्तपत्र कंपन्यांना जाहिरातींचे डॉलर्स कमी झाल्यामुळे संघर्ष करावा लागला होता.